अंडी आरोग्यदायी पण, 'या' लोकांनी चुकनही खाऊ नयेत, जाणून घ्या कारण
Health Tips : ब-याच लोकांना सकाळी नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या हलक्या भुकेपर्यंत अंडी खाणे आवडते. पण अंडे खाणे हे सर्वांसाठीच फायदेशीर नसते, अंडी खाल्ल्याने तुम्हाला आरोग्याशी समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीत ऑम्लेट असो वा अर्धवट तळलेले किंवा उकडलेले अंडे, ते खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसानच होते. अंड्याचे पदार्थ नाश्त्यासाठी पटकन तयार होत असले, कितीही वेळ वाचवणारे असले तरी तरी अनेक बाबतीत त्याचे दुष्परिणाम ही मोठी समस्या ठरू शकतात.
खराब पचनशक्ती
ज्यांची पचनशक्ती खराब असते अशा लोकांनी त्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश टाळावा. विशेषत: जर तुम्हाला गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाची समस्या असेल तर, अंडी खाल्ल्याने पोटात जडपणा आणखी वाढू शकतो कारण प्रकृती गरम असल्याने ते पचण्यास जड होते.

हृदयरोगाचे रुग्ण
हृदयाशी संबंधित आजारांनी त्रस्त असलेल्यांनीही अंडी खाणे टाळावे. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी तर वाढतेच पण रक्ताभिसरणातही अडथळा निर्माण होतो.
लठ्ठपणाची समस्या
अंडे उच्च प्रथिनयुक्त अन्न असल्याने, जर तुमचा वाटत असेल की अंडी तुमचे वजन कमी करण्यास मदत करु शकतात, तर तुम्ही चुकीचे आहात. किंबहुना त्यामध्ये असलेले प्रथिने आणि चरबीचे प्रमाण वजन आणखी वाढवू शकते.
किडनीच्या समस्या
अंड्यात प्रथिनांचा चांगला स्रोत असतो पण अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने किडनी खराब होऊ शकते, त्यामुळे किडनीशी संबंधित समस्या असल्यास ते सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा, अन्यथा ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
त्वचेच्या समस्या
एक्जिमा, पिंपल्स आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या असल्यास अंड्याचे सेवन टाळावे. प्रकृती उष्ण असल्याने त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो, त्यामुळे अनेकांना पुरळ, सूज आणि खाज सुटू शकते
(लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. आपल्याला काही प्रश्न किंवा चिंता असल्यास, नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)












Click it and Unblock the Notifications