Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मधुमेहाला निमंत्रण देणाऱ्या 'या' 5 सवयी, नेहमी टाळा! डायबेटीजच्या निदानानंतर 'ही' काळजी घ्या

Diabetes Risk Top 5 Habits : "सध्याच्या धावपळीच्या युगात मधुमेह हा 'सायलेंट किलर' ठरत आहे. अनेकजण डाएटमध्ये साखरेचे प्रमाण कमी करतात, पण तरीही त्यांचा 'ब्लड शुगर रिपोर्ट' वाढलेलाच येतो. याचे मुख्य कारण तुमच्या साखरेच्या डब्यात नसून तुमच्या रोजच्या जीवनशैलीत दडलेले आहे. अपुरी झोप, वाढता ताण आणि व्यायामाचा अभाव यांसारख्या सवयी कशा प्रकारे तुमच्या शरीरातील इन्सुलिनची यंत्रणा बिघडवत आहेत, हे पुण्याच्या प्रसिद्ध तज्ज्ञांनी दिलेल्या या माहितीवरून नक्कीच समजून घ्या."

Diabetes Risk Top 5 Habits

मधुमेहाला आमंत्रण देणाऱ्या 'या' ५ सवयी

१. अकार्यक्षम जीवनशैली

दिवसभर एकाच जागी बसून राहणे किंवा शारीरिक हालचाल न करणे हे मधुमेहाचे मुख्य कारण आहे. यामुळे शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता कमी होते आणि लठ्ठपणा वाढतो. आठवड्यातून किमान १५० मिनिटे चालणे, सायकलिंग किंवा पोहणे यांसारखे व्यायाम करणे आवश्यक आहे.

२. चुकीचा आहार

जंक फूड, तळलेले पदार्थ, मैदा आणि कोल्ड ड्रिंक्सचे अतिसेवन रक्तातील साखर वाढवते. आहारातात हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

३. अतिताण

सततचा मानसिक ताण शरीरातील 'कोर्टिसोल' हार्मोनची पातळी वाढवतो. याचा परिणाम भूक आणि झोपेवर होतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते. तणावमुक्तीसाठी योग आणि ध्यानाचा (Meditation) आधार घ्यावा.

४. अपुरी झोप

रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे आणि ६ तासांपेक्षा कमी झोप घेणे यामुळे हार्मोनल असंतुलन होते. संशोधनानुसार, कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो, जो मधुमेहासाठी कारणीभूत ठरतो. दिवसाला ७-८ तासांची शांत झोप घ्या.

५. धुम्रपान आणि मद्यपान

मद्यातील कॅलरीज चरबी वाढवतात, तर सिगरेटमुळे इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते. या दोन्ही सवयींमुळे केवळ मधुमेहच नाही तर कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याचा धोकाही वाढतो.

या चार गोष्टी करायला हव्या

नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाल

दररोज किमान ३० ते ४० मिनिटे वेगाने चालणे किंवा व्यायाम करावा. यामुळे शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.

संतुलित आणि फायबरयुक्त आहार

आहारात पालेभाज्या, कडधान्ये आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. साखर, गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. एकाच वेळी मोठे जेवण घेण्यापेक्षा थोड्या थोड्या अंतराने अल्प आहार घ्यावा.

वेळेवर औषधे आणि नियमित तपासणी

डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे किंवा इन्सुलिनच्या वेळा पाळाव्यात. रक्तातील साखरेची पातळी घरच्या घरी किंवा लॅबमध्ये ठराविक अंतराने तपासावी, जेणेकरून बदलांचा अंदाज येईल.

मानसिक ताण आणि पुरेशी झोप

मानसिक ताणामुळे रक्तातील साखर वाढू शकते, त्यामुळे तणावमुक्तीसाठी ध्यान (Meditation) किंवा योगासने करावीत. तसेच, शरीराची झीज भरून काढण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+