क्रिस्टियानो रोनाल्डोने कडाक्याच्या थंडीत बर्फ आंघोळ करतानाचा व्हिडिओ केला शेअर, जाणून घ्या फायदे
Ronaldo Ice Bath Video : जगातील सर्वात तंदुरुस्त फुटबॉलपटूंपैकी एक असलेला आपला फिटनेससाठी सतत मेहनत घेतो. आपल्या फिटनेससाठी जागरुक रोनाल्डो सतत नवनवीन प्रयोग करत राहतो. अलीकडेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बर्फाच्या पर्वतांमध्ये थंड पाण्याने अंघोळ करताना दिसत आहे.
या थेरपीला आइस बाथ असं म्हटलं जातं. ज्यामध्ये शरीराला काही काळ थंड पाण्यात बुडवून ठेवल्याने ब्लड सर्कुलेशन सुधारते. तसेच शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा मिळते. आइस बाथमुळे स्नायूंची सूज कमी होऊन शरीराचा थकवा निघून जातो. फास्ट रिकव्हरीसाठी ही थेरपी सामान्यत ऍथलीट्सद्वारे वापरली जाते.

रोनाल्डोने व्हिडिओ केला शेअर
क्रिस्टियानो रोनाल्डोने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो शॉर्ट्स परिधान करून बर्फाळ पर्वतांमध्ये एका लहान तलावात डुबकी मारत आहे. हे तलाव बर्फाच्या पाण्याने भरलेले आहे.
रोनाल्डो बॉडी रिकव्हरी करण्यासाठी काही मिनिटे बर्फाच्या पाण्यात राहतो. या थेरपीला आइस बाथ म्हणतात. ज्यामुळे स्नायूंची सूज कमी होते तसेच थकवा दूर होतो आणि ब्लड सर्कुलेशन सुधारते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्याला लाखो लाईक्स मिळाल्या आहेत.
बर्फाची आंघोळ कशी करावी
बर्फ आंघोळ करण्यासाठी पाण्याचे तापमान -10 ते -15 अंश सेल्सिअस दरम्यान असावे. सुरुवातीला फक्त एक ते दोन मिनिटे बर्फाचे स्नान करा आणि हळूहळू वेळ वाढवा. आईस बाथ घेण्यापूर्वी हृदयरोग्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हिवाळ्यात बर्फाने आंघोळ करण्यापूर्वी आपल्या शरीराला थंड तापमानात राहण्यासाठी तयार करा. जेणेकरून आपल्या शरीरावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाहीत.
बर्फ स्नान करण्याचे फायदे
बर्फाने आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत. हे हिवाळ्यात स्नायूंची सूज कमी करण्यास मदत करते. तसेच व्यायामानंतर स्नायूंना आराम देते. बर्फाच्या आंघोळीमुळे ब्लड सर्कुलेशन सुधारते. शरीराचे तापमान स्थिर राहते आणि त्वचेला आणि इतर अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो.
तज्ज्ञांच्या मते नियमित बर्फ स्नान केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीर प्रत्येक तापमानाशी जुळवून घेते. हे आनंदी हार्मोन्स (एंडॉर्फिन) चे स्तर वाढवतो, ज्यामुळे मूड फ्रेश होत तणाव कमी होतो. याव्यतिरिक्त, ते ऊर्जा वाढवते आणि कॅलरी लवकर बर्न करते.












Click it and Unblock the Notifications