कफ सिरपमुळे आतापर्यंत 16 बालकांचा मृ्त्यू! चुकीला माफी नाही सरकार आक्रमक, डाॅक्टर- कंपनीवर गुन्हा
Cough syrup 16 children died so far : मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे दूषित कफ सिरपमुळे आतापर्यंत ताजी माहिती समोर आली असून आतापर्यंत १६ बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या गंभीर घटनेनंतर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ॲक्शन मोडवर आले आहे. तर मध्य प्रदेश सरकारने कठोर कारवाई केली आहे. डॉक्टर आणि उत्पादक कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, डॉ. प्रवीण सोनी यांना काल रात्री अटक करण्यात आली. तामिळनाडूच्या औषध उत्पादक, श्रीसन फार्मास्युटिकल्सविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर, विशेष तपास पथक (एसआयटी) तामिळनाडूची चौकशी करेल. दरम्यान, काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात कोल्ड्रिफ सेवनामुळे हानिकारक डायथिलीन ग्लायकोलचे प्रमाण ४८.६% असल्याचे खात्री करण्यात आली.
आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांच्या निर्देशानुसार, केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत एक तातडीची उच्च-स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू दोन महत्त्वाच्या गोष्टींवर होता, यामध्ये औषधांच्या गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन आणि लहान मुलांमध्ये कफ सिरपचा तर्कशुद्ध वापर. कारण, बालकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कोणत्याही निष्काळजीपणाला आता सरकारकडून 'माफ नाही' असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
बैठकीतील मुख्य मुद्दे
कफ सिरपची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्याचा गैरवापर रोखण्यासाठी बैठकीत खालील तीन मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. उत्पादन युनिट्समध्ये गुणवत्ता मानकांचे कठोर पालन: 'शेड्यूल एम' आणि इतर आवश्यक जी.एस.आर. तरतुदींचे औषध उत्पादन युनिट्सनी काटेकोरपणे पालन करावे.
कफ सिरपचा तर्कशुद्ध वापर
मुलांसाठी कफ सिरपमध्ये अतार्किक मिश्रणे आणि अयोग्य औषधांचे एकत्रीकरण टाळण्याची नितांत गरज आहे. चुकीच्या औषधांची विक्री आणि गैरवापर रोखण्यासाठी किरकोळ औषध विक्रेत्यांचे नियमन मजबूत करण्यासंदर्भात सरकारने पाऊले उचचली आहे.
'कोल्डरिफ' सिरपमध्ये 'DEG' मर्यादेपेक्षा जास्त
छिंदवाडा येथील प्रकरणांच्या सखोल चौकशीसाठी केंद्रीय तज्ज्ञ पथकाने NCDC, NIV, CDSCO चे तज्ज्ञ घटनास्थळांना भेटी दिल्या. या तपासणीतून आलेले प्राथमिक निष्कर्ष धक्कादायक आहेत. लेप्टोस्पायरोसिसचा एक पॉझिटिव्ह रुग्ण वगळता, सामान्य संसर्गजन्य रोगांची शक्यता नाकारण्यात आली आहे. विश्लेषण केलेल्या १० नमुन्यांपैकी ९ नमुने गुणवत्ता मानकांवर योग्य ठरले. मात्र, एका कफ सिरपच्या नमुन्यात, म्हणजेच 'कोल्डरिफ' नावाच्या सिरपमध्ये, डीईजी (DEG) विषारी रसायन अनुमेय मर्यादेपेक्षा जास्त आढळले.
या सिरपच्या उत्पादनासाठी जबाबदार असलेल्या तामिळनाडूतील युनिटवर नियामक कारवाई सुरू करण्यात आली आहे. तपासणी निष्कर्षांच्या आधारे, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने या युनिटचा उत्पादन परवाना रद्द करण्याची शिफारस केली असून, फौजदारी कारवाई सुद्धा सुरू करण्यात आली आहे.
आरोग्य सचिवांचा राज्यांना आणि पालकांना महत्त्वाचा सल्ला
- सुधारित शेड्यूल एमचे कठोर पालन करा.
- लहान मुलांमध्ये कफ सिरपचा तर्कशुद्ध वापर करा.
- बहुतेक खोकल्याचे प्रकार हे उपचारांशिवाय आपोआप बरे होतात आणि त्यांना औषधी उपचारांची आवश्यकता नसते. त्यामुळे विशेषतः लहान मुलांमध्ये सिरपचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि अत्यंत आवश्यक असतानाच करावा.
- याबाबत DGHS ने जारी केलेल्या सल्ल्याचे पालन सुनिश्चित करावे.
DGHS चा नेमका सल्ला काय?
DGHS ने स्पष्ट केले आहे की, दोन वर्षांखालील मुलांना सर्दी-खोकल्याची औषधे कधीही लिहून देऊ नयेत किंवा विकली जाऊ नयेत. पाच वर्षांखालील मुलांसाठी, डॉक्टरांच्या कठोर वैद्यकीय देखरेखीखाली असल्याशिवाय ही औषधे देणे पूर्णपणे टाळावे. जर मोठ्या मुलांना कफ सिरप द्यायचेच असेल, तर ते कमीतकमी प्रभावी वेळेसाठी, योग्य डोसमध्ये आणि एकाचवेळी अनेक औषधांचे मिश्रण नसलेले असावे.












Click it and Unblock the Notifications