Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Corona virus : सावधान कोरोना व्हायरस पुन्हा आलाय! 'या' शहरात महिलेचा मृत्यू; दुसऱ्या रुग्णांवर उपचार

Corona virus : 2019 पासून जगात थैमान घातलेला कोरोना व्हायरस भारतात पुन्हा आढळला आहे. इंदौर येथे एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तेथे महिलेसह आणखी एका रुग्णाचे कोविड 19 चे निदान झाले आहे.

कोविडचे निदान झालेल्यांपैकी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला तर दुसरा रुग्ण उपचार घेत आहे. मृत महिलेला किडनीच्या आजारामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते पण तिला कोविड असल्याचेही निदान झाले त्यानंतर उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

Corona virus is back Woman dies of COVID-19

इंदौरच्या महिलेला संसर्ग अन् मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, मृत महिला ही पश्चिम इंदौरची राहणारी होती. त्यांचे वय 74 होते. त्यांना किडनीच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांची कोविड 19 स्वॅब चाचणी करण्यातआली असता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे झी न्यूजने वृत्त दिले आहे.

डाॅक्टरांनी स्पष्ट केले की, काही रुग्णांना सर्दी आणि खोकला सतत राहतो तो जात नाही, त्यासाठी फ्लु पॅन टेस्ट करावी लागते ती चाचणी केल्यानंतर त्यात कोरोनाची लक्षणे सदर महिलेत आढळली त्यानंतर तिच्यावर कोरोनाशी संबंधित उपचार सुरु करण्यात आले होते. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ आणि वय जास्त तसेच इतर व्याधी या कारणांनी या महिलेचा अखेर सोमवारी 21 एप्रिल 2025 रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान मत्यू झाला.

तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार

कोविड 19 ची बाधा झाल्याचे आणखी एक प्रकरण मध्यप्रदेशातील इंदौर येथे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात एक युवकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे माध्यमांनी वृत्त दिले आहे.

कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

  • कोविड 19 विरूद्धच्या लढाईत मास्क हे सर्वात उपयुक्त शस्त्र आहे.
  • मास्क कसा वापरावा आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची हे आपल्याला माहित असले पाहिजे.
  • मास्क वापरताना योग्य काळजी घेणे महत्वपूर्ण असून त्यासाठी घर आणि ऑफिससाठी स्वतंत्र मास्क वापरणे.
  • मास्क थेट एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर न ठेवणे, N95 मास्क साबण/डिटर्जंटने न धुणे, N95 मास्कची विल्हेवाट लावताना विशेष काळजी घेणे इत्यादी गोष्टींचा अवलंब केला पाहिजे.

हेही वाचा : धक्कादायक! एकाच वेळी 10 जणांना HIV; आरोग्य विभागही हादरला, पोलिस तपासात 'हे' कारण आलं समोर

हेही वाचा : Health Tips : तुम्हाला माहिती आहे का, उन्हाळ्यात दिवसभर किती ग्लास पाणी प्यावं, जाणून घ्या सविस्तर

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+