धक्कादायक! एकाच वेळी 10 जणांना HIV; आरोग्य विभागही हादरला, पोलिस तपासात 'हे' कारण आलं समोर
एकाच वेळी १० जणांना एचआयव्ही लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. ही बातमी केरळच्या मल्लपूरम येथून आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागही चांगलाच हादरला. एकाच वेळी, एकाच कारणाने, एवढ्या लोकांना एचआयव्हीची लागण होण्याची ही दुर्मिळ घटना आहे. या प्रकारानंतर आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली. मात्र पोलिस तपासात या घटनेमागे एक धक्कादायक कारण असल्याचे समोर आले.

काय होते प्रकरण?
केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात वलंचेरी नगरपालिका क्षेत्रात हा प्रकार उघडकीस आला. तेथे 10 जणांना HIV ची लागण झाली. आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी केल्यावर या 10 पैकी तीन व्यक्ती या इतर राज्यातील आहेत. तर सात व्यक्ती या स्थानिक आहेत. आरोग्य विभागाने ही माहिती पोलिसांना दिल्यावर एक धक्कादायक कारण समोर आले.
कशामुळे झाला एचआयव्ही?
एचआयव्हीची लागण झालेले सर्व रुग्ण हे नशेबाज आहेत. हे सर्व ड्रग्जचे सेवन करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. या सर्वांनी एकाच सुईने ड्र्ग्ज घेतले होते. या दहापैकी पहिल्या व्यक्तीला एचआयव्ही होता. त्यानंतर इतर नऊ जणांनी तीच सुई वापरून ड्रग्जची नशा केली. त्यानंतर या सर्वांना एचआयव्हीची लागण झाली.
पोलिस तपास सुरु
या घटनेचा तपास पोलिसांनी तातडीने सुरु केला. यापैकी तीन जण हे स्थलांतरीत मजूर होते. तर सात जण हे स्थानिक होते. मात्र त्यांनी कुणाकडून ड्रग्ज घेतले. पहिल्या नशेबाजाला कशामुळे एचआयव्ही झाला होता, या कारणांचा शोध घेतला जात आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
आरोग्य विभागही हादरला
जानेवारी 2025 मध्ये केरळ एड्स नियंत्रण असोसिएशनने वलंचेरी येथे एक HIV रुग्ण असल्याची पुष्टी केली होती. आरोग्य विभागाने तपास केल्यानंतर समोर आलं की, संक्रमित व्यक्तीने वापरलेली सीरींज अन्य 9 लोकांनी वापरली होती. त्याचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत.
काय म्हणतो आरोग्य विभाग?
जिल्हा चिकित्सा अधिकारी आर. रेणुका यांनी नशेच्या औषधांच सेवन करणाऱ्यांमध्ये HIV संक्रमण वाढण्याची भिती व्यक्त केली. वलंचेरी येथे HIV ची लागण झालेले 10 जण नशेच्या औषधांचे सेवन करत होते, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबामध्ये HIV संक्रमण पसरण्याची भितीही त्यांनी व्यक्त केली. संक्रमित झालेल्यांच्या कुटुंबियांची आता तपासणी सुरु आहे.












Click it and Unblock the Notifications