कोरोना वाढतोय; बूस्टर डोस घ्यावा का? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या

कोविड-१९ महामारी काहीशी कमी झाली असली तरी ती पूर्णतः संपलेली नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. आशियातील सिंगापूर, चीन, थायलंड, हाँगकाँग आणि भारतात कोरोनाचे नवीन रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.

corona variant 2025 booster dose guidelines india


विशेषतः भारतात १९ मे २०२५ पर्यंत २५७ सक्रिय रुग्ण नोंदवले गेले आहेत. यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, परिस्थिती नियंत्रणात आहे, पण नागरिकांनी सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे.

कोणत्या देशांत वाढले रुग्ण?

सिंगापूर: मे महिन्याच्या सुरुवातीला १४,००० पेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत २८% अधिक आहेत.
हाँगकाँग: १० आठवड्यांत रुग्णसंख्या तब्बल ३० पट वाढली.
चीन: कोरोना चाचण्यांतील पॉझिटिव्हिटी रेट दुप्पट झाला आहे.
थायलंड: सोंगक्रान उत्सवानंतर रुग्णसंख्येत मोठी वाढ.
भारत: केवळ २५७ सक्रिय रुग्ण असून, त्यातील बहुतांश प्रकरणे केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यांमधील आहेत.

कोणता व्हेरियंट जबाबदार आहे?

या नव्या लाटेसाठी ओमिक्रॉनचा JN.1 व्हेरियंट आणि त्याचे उपप्रकार LF.7 आणि NB.1.8 जबाबदार आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये WHO ने JN.1 ला 'व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट' घोषित केले होते. हे व्हेरियंट अत्यंत संक्रमित करणारे असले तरी, विशेषतः गंभीर नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बहुतेक रुग्णांमध्ये फक्त सौम्य लक्षणे - ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव, अंगदुखी - दिसून येतात.

भारताची सद्यस्थिती काय आहे?

भारतात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. रुग्णसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. बहुतेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज पडत नाही. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, देशात सध्या नव्या लाटेचा धोका नाही, पण सतर्कता अत्यावश्यक आहे.

बूस्टर डोस घ्यावा का?

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे - जसे की वृद्ध, लहान मुले, आणि मधुमेह, कर्करोगासारखे आजार असलेले रुग्ण - त्यांनी बूस्टर डोस घेण्याचा विचार नक्कीच करावा.

सिंगापूर आणि हाँगकाँगमध्येही नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, विशेषतः ज्यांना शेवटचा डोस किंवा संसर्ग ६ महिन्यांपूर्वी झाला असेल. भारतातही जर आपण अशा देशात प्रवास करणार असाल, जिथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तर बूस्टर डोस घेणे योग्य ठरू शकते.

WHO च्या माहितीनुसार, XBB.1.5 मोनोव्हॅलंट बूस्टर JN.1 विरुद्ध १९% ते ४९% पर्यंत संरक्षण देऊ शकतो.

कशी घ्यावी काळजी?

मास्क वापरा: गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे अत्यावश्यक आहे.
हात स्वच्छ ठेवा: वारंवार हात धुवा किंवा सॅनिटायझर वापरा.
प्रवासात काळजी घ्या: सिंगापूर, चीन, हाँगकाँग, थायलंडसारख्या देशांत जाताना विशेष काळजी घ्या.
लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करा: ताप, सर्दी, घसा दुखणे इ. लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून उपचार घ्या.

घाबरू नका, सजग राहा

कोरोनाचा हा नवा व्हेरियंट तुलनेने सौम्य आहे. भारतात परिस्थिती सध्या नियंत्रणात असून सरकारही सजग आहे. पूर्वी लस घेतलेल्यांना विशेष घाबरण्याची गरज नाही, मात्र ज्यांना धोका अधिक आहे, त्यांनी बूस्टर डोसबाबत विचार करावा. कोविड-१९ अजूनही पूर्णतः गेलेला नाही, पण योग्य काळजी घेतल्यास आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+