मधुमेहींनी खजूर खाणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात..
Can Diabetes Patients Eat Dates : बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे सध्या मधुमेहाची समस्या घराघरात पोहोचली आहे. अशा परिस्थितीत काय खावे आणि काय टाळावे, याबाबत रुग्णांमध्ये नेहमीच गोंधळ असतो. अनेकदा गोड चवीमुळे मधुमेही रुग्ण खजूर खाणे टाळतात, पण निसर्गाचा गोडवा असलेला खजूर केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही 'सुपरफूड' मानला जातो. पण रक्तातील साखर वाढण्याची भीती असलेल्या मधुमेही रुग्णांसाठी तो खरोखर सुरक्षित आहे का? हा प्रश्न अनेकांना आहे.
नवीन संशोधनानुसार, खजुराचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' कमी असल्याने आणि त्यातील फायबरच्या प्रमाणामुळे तो साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतो. मात्र, तो खाण्याची एक विशिष्ट पद्धत आणि मर्यादा आहे, जी प्रत्येक रुग्णाने जाणून घेणे आवश्यक आहे." 'बोल्ड स्काॅय'ने दिलेल्याडायटिशियन अबर्ना माथीवानन यांनी मते, मधुमेही रुग्ण मर्यादित प्रमाणात खजुराचे सेवन करू शकतात.

२. खजूर खाण्याचे फायदे आणि तज्ज्ञांचा सल्ला
पोषक तत्वांचा खजिना: खजुरामध्ये व्हिटॅमिन-बी६, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते.
साखरेवर नियंत्रण: खजुरातील फायबर रक्तातील साखरेचे शोषण संथ करते, ज्यामुळे शुगर लेव्हल अचानक वाढत नाही.
ऊर्जेचा स्रोत: यात नैसर्गिक साखर असल्याने थकवा दूर होऊन शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
हाडांचे आरोग्य: थंडीच्या दिवसात खजूर खाल्ल्याने शरीर उबदार राहते आणि हाडे मजबूत होतात.
किती प्रमाणात खावे?
तज्ज्ञांच्या मते, एक सामान्य मधुमेही रुग्ण दिवसाला १ ते २ खजूर खाऊ शकतो. मात्र, ते खाताना सोबत बदाम किंवा अक्रोड यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ घेतल्यास साखरेचे शोषण अधिक संथ होते.
(महत्त्वाची सूचना : सदर माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. जर तुमची शुगर लेव्हल सतत उच्च राहत असेल, तर आहारत बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञ आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)












Click it and Unblock the Notifications