Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Budget 2025 मध्ये 'मखाना'ने खाल्ला भाव; मखान्याची चर्चा का झाली? मखान्यासाठी काय तरतूद केलीय?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केला. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्या. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात बिहारच्या शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा केल्या. त्या म्हणाल्या की, बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाईल. भारतात आणि परदेशात मखानाची मागणी झपाट्याने वाढत आहे. तळलेल्या आणि गोड पदार्थांना पर्याय शोधणाऱ्या लोकांसाठी मखाना हा एक आवडता पदार्थ बनत चााललाय. या वाढत्या मागणीमुळे उद्योजकांना मखाना व्यवसायात प्रवेश करण्याची आणि आरोग्याविषयी जागरूक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. इंग्रजीत फॉक्स नट्स म्हणून ओळखले जाणारे मखाना आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा मखाना उत्पादक देश आहे, ज्यामध्ये ८० टक्के मखाना फक्त बिहारमध्ये उत्पादित केला जातो.

Budget 2025

मखाना फक्त भारतातच

एका अहवालानुसार, जगातील ९० टक्के मखाना फक्त भारतातून येतो. अशा परिस्थितीत, जगभरात अचानक मखान्याची मागणी का वाढू लागली आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. मखाना हा केवळ अन्नपदार्थ नाही तर एक सुपरफूड आहे जो अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. मखान्याच्या फायद्यांमुळे, तो भारत आणि जगातील लोकांच्या आहाराचा एक भाग बनत आहे. मखान्यापासून तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. वजन नियंत्रणात ठेवते

मखान्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी५, नियासिन, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, बी-कॉम्प्लेक्स असते. त्यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. दररोज मुठभर मखाना खाल्ल्याने तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागणे आणि जंक फूडची सवय कमी होते. हे वजन कमी करण्यास मदत करते.

२. मधुमेहावर राहते नियंत्रित

मखान्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. मधुमेह असलेल्या लोकांसाठी मखाना हा एक उत्तम नाश्ता असू शकतो. तुम्ही मखाना साधा खाऊ शकता, भाजून घेऊ शकता किंवा सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकता. याशिवाय, ते स्मूदी, ज्यूस आणि शेकमध्ये देखील मिसळता येते. मखाना दुधात उकळूनही खाऊ शकतो. याशिवाय बरेच लोक मखानाची भाजी देखील बनवतात.

३. हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

मखान्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. हे कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

४. हाडे मजबूत बनवते

मखान्यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम जास्त असते. यामुळे हाडं मजबूत राहतात. मखान्याचे नियमित सेवन केल्याने हाडांचे दुखणे आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

५. वृद्धत्व दूर ठेवते

मखान्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात. त्वचेचे वृद्धत्व वाढवण्यासाठी हेच रॅडिकल्स जबाबदार असतात. अशा परिस्थितीत, मखान्याचे सेवन केल्याने सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते. याच्या नियमित वापरामुळे तुमची त्वचा उजळते आणि तुम्ही तरुण दिसता.

मखाना बोर्डाच्या स्थापनेमुळे बिहारमधील शेतकऱ्यांना तांत्रिक आणि आर्थिक मदत मिळेल. यामुळे मखान्याची गुणवत्ता सुधारेल आणि उत्पादन वाढेल. या उद्योगाचे आयोजन करून, सरकार शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देईल, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+