Weight Loss : ब्लॅक कॉफी की मिल्क कॉफी? वजन कमी करण्यासाठी काय प्यावे?
Black Coffee Vs Milk Coffee : जगभरातील लोकांसाठी लठ्ठपणा ही मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणा ही एक आता चिंतेची बाब बनली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक युक्त्या वापरतात. काही जण वजन कमी करण्यासाठी शॉटकटचा वापरा करतात. तर काही जण आपला योग्य डाएट करुन करुन वजनी करण्यासाठी प्रयत्न करतात. तर काही काही जण योगा किंवा मैदानावर घाम गाळून वजन कमी करतात.
काही लोकांचे वजन कमी होत नाही. त्याचं मुख्य कारण असतं आपली लाइफस्टाइल. विशेष करुन काही खाण्यापिण्याच्या सवयींसारख्या छोट्या-छोट्या गोष्टी बदलून सुध्दा आपण आपलं वजन कमी करण्याचा प्रवास सोपा करू शकतो.
अनेकदा वजन कमी करण्यासाठी अनेकजण कॉफीचाही आधार घेतात. काही लोक ब्लॅक कॉफी पिऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक दुधाची कॉफी पिऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, वजन कमी करण्यासाठी काळी की दुधाची कॉफी चांगली याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.

वजन कमी करण्यासाठी कॉफी पिण्याचे फायदे
ब्लॅक कॉफी ही मेटाबॉलिज्म बूस्टर मानली जाते. हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. ब्लॅक कॉफीमध्ये असलेले कॅफिन मेटाबोलिज्म वाढवू शकते. तसेच कमी वेळेत जास्त कॅलरीज बर्न करू शकते. ब्लॅक कॉफी भूक कमी करण्याचेही काम करते. मात्र, त्यासाठी भरपूर संतुलन असणं आवश्यक आहे.
काळी की दुधाची कॉफी जास्त फायदेशीर ?
कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. दुधासह कॉफीमध्ये कॅलरीज जास्त असतात, जे वजन वाढवण्यासाठी ओळखले जाते. ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीज नसतात परंतु साखर आणि दूध घातल्याने कॅलरीचे प्रमाण वाढते. साखर आणि दूध न घालता कॉफी पिणे आरोग्यासाठी अधिक गुणकारी मानले जाते. यामध्ये असलेले कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स मधुमेहासारख्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानली जाते. कारण ते वजन कमी करण्यास मदत करते. रक्तातील साखर नियंत्रित करते. त्यासोबत अँटिऑक्सिडंट्स भरपूर असते.
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर ब्लॅक कॉफी पिणे तुमच्यासाठी जास्त फायदेशीर आहे. कारण ब्लॅक कॉफीमध्ये कमी कॅलरीज असतात. एका कप ब्लॅक कॉफीमध्ये 20 कॅलरीज असतात, तर दुधासह बनवलेल्या कॉफीमध्ये 60 कॅलरीज असतात. कॅफिन शरीरात मेटाबॉलिज्म वाढवते. ज्यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते.












Click it and Unblock the Notifications