आर. माधवनने 21 दिवसांत वजन केलं कमी, काय आहे फॉर्म्यूला घ्या जाणून
R.Madhvan Waitloss News : बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपलं वजन कमी करण्यासाठी नेहमीत व्यायम आणि डाएटला फॉलो करतात. जेणेकरुन त्यांच वजन स्थिर राहतं. बॉलीवूड अभिनेता आर. माधवने 21 दिवसात वजन कमी करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
आर. माधवने वजन कसे कमी करायचे याबाबत आपल्या चाहत्यांना खास टिप्स ही दिल्या आहेत. तसेच त्याने आपलं वजन कसं कमी केलं आहे, यामागील रहस्य ही सांगितलं आहे. आर. माधवन म्हणाला की जर एखाद्या व्यक्तीने 21 दिवस योग्य आणि संतुलित दिनचर्या पाळली तर शरीरात मोठा बदल दिसून येतो.

माधवनच्या मते, त्याच्या फिटनेसचे रहस्य म्हणजे आहार आणि व्यायामाचे योग्य नियम पाळणे आहे. तो निरोगी खाणे आणि नियमित व्यायाम यावर भर देतो. त्यांने आळस दूर करण्याचा आणि शिस्त राखण्याचा सल्ला आपल्या चाहत्यांना दिला आहे. त्याच्या फिटनेसचा मुख्य मंत्र म्हणजे संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम आहे. ज्यामुळे तो लठ्ठपणापासून तंदुरुस्त होण्यास मदत झाल्याच त्याने सांगितलं आहे.
वजन कमी करण्यासाठी शिस्त कामाची
आर. माधवनने वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंगचा अवलंब केला आहे. त्याने 21 दिवस कोणताही व्यायाम न करता योग्य जेवणे आणि जेवणाच्या वेळा ठरवून आपला फिटनेस राखला आहे. माधवनने दररोज ही दिनचर्या पाळून स्वतःला तंदुरुस्त ठेवलं आहे. त्यांच्या मते, योग्य आहाराचा प्लॅन आणि शिस्तीने व्यायामाशिवायही वजन कमी करता येते.
आर. माधवनने सांगितल्या या टिप्स
आर. माधवन संध्याकाळचे शेवटचे जेवण 7 वाजण्यापूर्वी करतो. त्यांचे अन्न प्रोटीन आणि फॅटमुक्त असते. तो दररोज सकाळी काहीवेळ चालतो . यासोबतच तो त्याची झोपही पूर्ण करतो. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 7-8 तासांची झोप खूप महत्त्वाची असल्याचं त्याने सांगितलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजण्यापूर्वी तो काहीही खात नाही. यानुसार उपवास 15 ते 16 तासांचे होतो. तसेच त्याने एक महत्वाचा सल्ला ही आपल्या चाहत्यांना दिला आहे. तो म्हणतो की अन्न व्यवस्थित चावून खालं पाहिजे.
अधूनमधून उपवास करण्याचे फायदे
अधूनमधून उपवास केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखर नियंत्रणात राहते. हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि मानसिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त आहे. उपवास केल्याने शरीर डिटॉक्स होते, ज्यामुळे उर्जेची पातळी वाढते. योग्यरित्या घेतल्यास ते तंदुरुस्ती आणि एकूण आरोग्य ही सुधारते.












Click it and Unblock the Notifications