अशा लोकांनी मटार खाऊ नये, आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
Peas Side Effects: सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. या दिवसात ताज्या हिरव्या भाज्या मोठ्या प्रमाणात भाजी मार्केटमध्ये अगदी सहज मिळतात. चविष्ट आणि पौष्टिक अशा हिरव्या भाज्या खाणे आरोग्यसाठी फायदेशीर असते. पण कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ही ठरू शकते. हिवाळ्यात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या भाजी मटारमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिकता असते परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
मटारमध्ये फायबर आणि प्युरिनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पाचन समस्या, गॅस आणि सूज येऊ शकते. जास्त मटार खाल्ल्याने यूरिक ऍसिड वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनीही याचे सेवन नियंत्रित प्रमाणात करावे, कारण त्यामुळे रक्तातील साखरचे प्रमाण वाढू शकते. मटार संतुलित प्रमाणात खाणे आरोग्यासाठी कधी ही चांगले असते.

पचनाच्या समस्या: मटारमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅस, पोट फुगणे आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, अशा लोकांनी याची विशेष काळजी घ्यावी.
जठरासंबंधी त्रास
मटारमध्ये नैसर्गिक शर्करा आणि फायबर असतात, जे गॅस्ट्रिक समस्या वाढवू शकतात. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात जडपणा जाणवू शकतो.
सांधेदुखीचा त्रास असणा-या लोकांनी घ्यावी विशेष काळजी
मटारमध्ये प्युरीन नावाचा घटक आढळतो, ज्यामुळे शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. ज्यांना संधिरोग किंवा सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी मटार मर्यादित प्रमाणात खावे.
मधुमेही रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी
मटारमध्ये नैसर्गिक साखर असते. ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेही रुग्णांनी मटारचे सेवन माफक प्रमाणात करावे.
वजन वाढण्याचा धोका: मटारमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण चांगले असते. ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅलरीज वाढू शकतात, ज्यामुळे वजन वाढू शकते.
सूचना: मटार मर्यादित प्रमाणात खा आणि त्याला संतुलित आहाराचा भाग बनवा. जास्त मटार खाणे टाळण्यासाठी, ते इतर भाज्यांमध्ये मिसळून शिजवणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. काही आरोग्य समस्या असल्यास तज्ञाचा सल्ला जरुर घ्यावा.












Click it and Unblock the Notifications