दों दिल मिल गये! आशिष चंचलानी आणि एली अवरामच्या नात्याला मिळाला 'Finally', फोटो व्हायरल!
Ashish Chanchalani confirms dating Elli Avram : गेल्या काही महिन्यांपासून युट्यूबर आणि कॉमेडियन आशिष चंचलानी आणि अभिनेत्री एली अवराम यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता या दोघांनी असे काही केले आहे, ज्यामुळे त्यांच्या नात्याला जवळजवळ अधिकृत पुष्टी मिळाली आहे.
आशिषने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, जो त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहते असा निष्कर्ष काढत आहेत की, हे दोघे खरोखरच एकमेकांना डेट करत आहेत आणि त्यांनी आता जाहीरपणे याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे या फोटोसोबत त्यांनी जास्त काही लिहून स्पष्टीकरण दिलेले नाही, याचा अर्थ त्यांनी त्यांच्या नात्याला दुजोरा दिलाय, अशी चर्चा देखील आता सुरू झालीय.

आशिष चंचलानीने केली पोस्ट!
शनिवारी, 12 जुलै 2025 रोजी, आशिष चंचलानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एली अवरामचा हात धरून तिला सोबत घेऊन जाताना दिसत आहे. एलीच्या हातात गुलाबांचा एक सुंदर गुच्छ आहे आणि दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे.
या फोटोत आशिषने पांढरा शर्ट आणि हलका ट्राउझर्स घातला आहे, तर एलीने पांढरा टॉप, काळी पँट आणि जॅकेट परिधान केले आहे. दोघेही युरोपातील एका सुंदर शहरात पोज देत असून, त्यांच्या पार्श्वभूमीवर नदीवर बांधलेला एक आकर्षक पूल दिसत आहे. आशिषने या फोटोला लाल हृदय आणि चमकणाऱ्या इमोजीसह केवळ "शेवटी" असे कॅप्शन दिले आहे, जे अनेक अर्थ सूचित करते.
चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव
आशिष चंचलानीने शेअर केलेला हा फोटो पाहिल्यानंतर चाहते तथा इंटरनेट युझर्स आनंद आणि आश्चर्याने भारावून गेले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या भावनांचा कल्लोळ पाहायला मिळत आहे. एका नेटिझनने लिहिले आहे, "ओएमजी! खरोखर?" दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली आहे, "मला आशा आहे की ते चांगले होईल." तिसऱ्या चाहत्याने विचारले आहे की, "ओएमजी! तुम्ही हे खरोखर पोस्ट केले आहे का?" तर अनेकांनी त्यांना "अभिनंदन भाऊ," अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. एकाने विनोदी शैलीत लिहिले आहे, "वीज बिल आता दोन लोकांमध्ये विभागले जाईल." "राधे भैय्या गेला," अशी टिप्पणी करत एका वापरकर्त्याने आशिषच्या जुन्या मिम्सची आठवण देखील करून दिलीय.
अफेअरच्या चर्चांना अखेर मिळाला पूर्णविराम!
यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये आशिष चंचलानी आणि एली अवराम एकत्र दिसले होते. तेव्हापासूनच प्रसारमाध्यमांमध्ये ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. तथापि, दोघांपैकी कोणीही यापूर्वी कधीही उघडपणे याबद्दल काहीही बोलले नव्हते. आता आशिष चंचलानीच्या या 'Finally' केलेल्या पोस्टमुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळतो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications