26/11 च्या हल्ल्यावरील टाँप फाईव्ह चित्रपट, तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा...
मुंबईतील ताज हाँटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला म्हणजेच 26/11 च्या हल्ल्याला यावर्षी 16 वर्षे झालेत. तमाम महाराष्ट्राच्या हृदयावर हा हल्ला आजही तसाच कोरलेला आहे. या घटनेने तमाम मुंबईकरांमध्ये आणि देशभरात भीतीचे वातावरण पसरले होते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 दहशतवाद्यांनी ताज हॉटेलला वेढा घातल्यानंतर भारतीय पोलिस व जवानांनी दाखवलेल्या शौर्यानंतर त्यावेळी सर्वांचीच छाती गर्वाने फुलली होती. या घटनेत 9 हल्लेखोरांसह सुमारे 175 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. सुमारे 300 हून अधिक लोक या हल्ल्यात जखमी झाले होते. या घटनेवर नंतर अनेक चित्रपट व वेबसिरीज आल्या. त्याबाबतच आपण आज माहिती पाहणार आहोत...

मुंबई डायरीज
मुंबई डायरीज हा चित्रपट 2021 मध्ये अमेझाँनवर प्रदर्शित झाला होता. यात 26/11 ची कथा अत्यंत सुंदर पद्धतीने दाखविण्यात आली होती. हा चित्रपट निखिल गोन्साल्विस आणि निखिल अडवाणी यांनी बनवला होता. या चित्रपटाला त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा मुंबईतील सरकारी हॉस्पिटलच्या आवारावर चित्रीत करण्यात आला आहे. 26/11 च्या हल्ल्यावेळी एका भावाची कथा आहे जो त्या हल्लात होता. या चित्रपटात मोहीत रैना, नताशा भारद्वाज, कोंकणा सेन शर्मा आणि इतर अनेक प्रमुख भूमिका आहेत.
हॉटेल मुंबई
हा चित्रपट अँथनी मारस यांनी दिग्दर्शित केला आहे. 26 नोव्हेंबर 2008 च्या संध्याकाळी जेव्हा अतिरेक्यांनी हॉटेलच्या आतील भागात वेढा घातला तेव्हा ताज हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पाहुण्यांचे रक्षण करण्यासाठी दाखवलेल्या धैर्याची आणि शक्तीची ही कथा होती. या चित्रपटात देव पटेल, नाझानिन बोनियाडी, आर्मी हॅमर, अनुपम खेर , टिल्डा कोभम-हर्वे, जेसन इसाक, सुहेल नय्यर आदी कलाकार होते. हा चित्रपटही प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.
द अटॅक ऑफ 26/11
मुंबई हल्ल्याच्या पाच वर्षांनंतर, 'द अटॅक्स ऑफ 26/11' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यात नाना पाटेकर आणि अतुल कुलकर्णी यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटात संजीव जयस्वाल या अभिनेत्याने दहशतवादी कसाबची भूमिका साकारली होती. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. नाना पाटेकर व अतुल कुलकर्णी यांच्या भूमिकांना विशेष दाद मिळाली होती.
ताजमहल
ताजमहाल हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता. जो फ्रेंच-बेल्जियन चित्रपट होता. या चित्रपटात 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांनी ताजमहाल पॅलेस हॉटेलवर केलेला हल्ला दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाती कलाकारांच्या भूमिकांनाही प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली होती.
मेजर
हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता. 'मेजर' हा चित्रपट मुंबई हल्ल्यात शहीद झालेले भारतीय लष्कर अधिकारी संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपटही त्यावेळी चांगलाच भाव खाऊन गेला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी आणि समिक्षकांनी चांगली दाद दिली होती.












Click it and Unblock the Notifications