'सैयारा'चा अहान पांडे जिच्या प्रेमात पडलाय ती श्रुती चौहान आहे तरी कोण, जाणून घ्या सर्व काही!
Ahan Pandey lover Who is Shruti Chauhan : अहान पांडेने 'सैयारा' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. मोहित सुरी दिग्दर्शित या अॅक्शन-रोमँटिक चित्रपटाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडूनही भरभरून दाद मिळत आहे.
रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे, जो दोन नव्या चेहऱ्यांसाठी एक मोठा विक्रम आहे. या मोठ्या यशानंतर, आता चाहते केवळ अहानच्या व्यावसायिकच नाही तर त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. याच उत्सुकतेतून एक नाव पुन्हा चर्चेत आले आहे श्रुती चौहान.

अहान पांडेची कथित प्रेयसी श्रुती चौहान कोण आहे?
'सैयारा'च्या यशासोबतच, श्रुती चौहान हे नाव पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहे, जिचे नाव अहान पांडेची कथित प्रेयसी म्हणून जोडले जात आहे. या दोघांपैकी कोणीही अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृत पुष्टी केलेली नसली तरी, 'सैयारा' चित्रपटासाठी श्रुतीने लिहिलेल्या एका भावनिक पोस्टमुळे या अटकळांना अधिक बळकटी मिळाली आहे.
श्रुती चौहान ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने झोया अख्तरच्या गाजलेल्या 'गली बॉय' चित्रपटात मायाची भूमिका साकारली होती. जयपूरची रहिवासी असलेल्या श्रुतीने ज्योती विद्यापीठातून कला शिक्षण घेतले आहे. अभिनयाव्यतिरिक्त, ती गायक जुबिन नौटियालसोबत 'हद से' या म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली आहे.
सोशल मीडियावर श्रुती फेमस अन् बॉलिवूड कनेक्शन
श्रुती चौहान सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिचे मोठे चाहते आहेत. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सध्या २.२३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे, खुशी कपूर, अलाया एफ, पलक तिवारी, ईशान खट्टर, अनन्या पांडे, अलिझेह अग्निहोत्री, सुहाना खान, आर्यन खान, नव्या नंदा आणि रणवीर सिंग यांसारखे अनेक मोठे बॉलिवूड सेलिब्रिटी तिला फॉलो करतात, जे तिच्या बॉलिवूडमधील मजबूत कनेक्शनची साक्ष देतात.
श्रुतीची भावनिक पोस्ट आणि नात्याच्या चर्चांना उधाण
'सैयारा' चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाला, ज्यात अहान पांडे आणि अनित पद्ढा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. वयाच्या २७ व्या वर्षी अहानने केवळ बॉलिवूडमध्ये पदार्पणच केले नाही, तर पहिल्याच आठवड्यात स्वतःला सिद्ध केले. त्याच्या पडद्यावरील अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले असले तरी, श्रुती चौहानच्या इंस्टाग्राम पोस्टने तिच्या ऑफ-स्क्रीन नात्यांबद्दलची चर्चा सुरू केली आहे.
श्रुती चौहानने तिच्या पोस्टमध्ये असे काय लिहिले
"त्या मुलासाठी जो नेहमीच हे स्वप्न जगला आहे, ज्याने इतर सर्वांनी शंका घेतल्या तरीही विश्वास ठेवला. ज्याने या क्षणासाठी सर्व काही दिले. जो या टप्प्याला सर्वात जास्त पात्र आहे - अहान पांडे. मी तुला प्रेम करते. मला तुझा अभिमान आहे. मी रडत आहे, ओरडत आहे आणि फक्त प्रार्थना करत आहे की तुला जे काही पात्र आहे ते मिळेल. जग आता तुला ओळखणार आहे."
या अत्यंत भावनिक पोस्टनंतर, अहान आणि श्रुतीच्या नात्याबद्दलच्या अटकळांना प्रचंड वेग आला आहे. आता चाहते फक्त या नात्याची अधिकृत पुष्टी होण्याची वाट पाहत आहेत.
अहान पांडेचे बॉलिवूड कनेक्शन
अहान पांडे हा बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेचा पुतण्या आहे. तो चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेचा मुलगा आहे. त्यामुळे, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही अहान पांडेची बहीण आहे. अहान पांडेने स्वतः सांगितले आहे की, अनन्या पांडेला पाहूनच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली.
'सैयारा'चे बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक यश
'सैयारा' या चित्रपटाने रिलीजच्या फक्त ४ दिवसांत १०० कोटींचा आकडा ओलांडला आहे. ४ दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये दोन नवीन कलाकारांसह प्रवेश करणारा हा एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे. अक्षय विद्वानी आणि यशराज फिल्म्सच्या निर्मिती असलेला हा चित्रपट मोहित सुरीने दिग्दर्शित केला आहे, जो 'आवारापन', 'जेहर', 'आशिकी २', 'एक व्हिलन', 'मलंग' यांसारख्या यशस्वी चित्रपटांसाठी ओळखला जातो.
या यशाच्या जोरावर, अहान पांडे आणि श्रुती चौहान यांच्यातील नात्याच्या चर्चा आणखी वाढतील यात शंका नाही. त्यांचे नाते केवळ मैत्रीचे आहे की, खऱ्या प्रेमात रूपांतरित झाले आहे, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


Click it and Unblock the Notifications
