Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शाकाहारी ढोंग करणाऱ्या विराट-अनुष्काने 'सापाचे मांस' खाल्ले?, 'व्हिएतनामी फो'संदर्भात मोठा खुलासा!

Virat kohli Anushka sharma Snake Meat : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हे त्यांच्या व्हेगन (शाकाहारी) आहारामुळे नेहमीच चर्चेत असतात. पण काही काळापासून सोशल मीडियावर एक धक्कादायक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे 2019 मध्ये लग्नाच्या वाढदिवशी या जोडप्याने 'सापाचे मांस' असलेले पदार्थ खाल्ले होते. या चर्चेमुळे अनेकांना धक्का बसला होता, कारण हे दोघेही प्राणीजन्य पदार्थांपासून दूर राहतात. आता या प्रकरणाबद्दल सेलिब्रिटी शेफ हर्ष दीक्षित यांनी खुलासा केला आहे.

नक्की काय होता हा पदार्थ?

2019 मध्ये विराट आणि अनुष्का यांनी व्हिएतनामी 'फो' नावाचा एक खास पदार्थ खाल्ला होता, असे सांगितले जाते. पारंपरिक व्हिएतनामी फो हे सापाचे मांस, सापाची वाईन, चिकन आणि बीफच्या रस्स्यापासून बनवले जाते. यामुळेच हे शाकाहारी जोडपे हा पदार्थ कसा खाऊ शकतात, असा प्रश्न निर्माण झाला होता. सोशल मीडियावर याच गोष्टीवरून जोरदार चर्चा सुरू झाली होती.

Virat kohli Anushka sharma Snake Meat

शेफ हर्ष दीक्षित यांचा खुलासा

प्रसिद्ध शेफ हर्ष दीक्षित यांनी नुकत्याच एका मुलाखतीत या प्रकरणावर सविस्तर माहिती देत मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, 2019 मध्ये विराट आणि अनुष्का यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी त्यांनी व्हिएतनामी फो बनवला होता, पण तो पारंपरिक पद्धतीने नाही.

हर्ष दीक्षित म्हणाले, "पारंपरिक फो शाकाहारी नाही, त्यामुळे व्हेगन डाएट घेणाऱ्यांसाठी तो तयार करणे एक मोठे आव्हान होते. डिशमध्ये चिकन आणि बीफ वापरले जाते, आणि व्हिएतनामी पदार्थांमध्ये सापाचे मांस आणि सापाची वाईनचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

पण त्यांनी यावर एक सर्जनशील उपाय शोधला. "सापाच्या मांसाच्या जागी मी स्मोक्ड स्नेक गोर्ड म्हणजेच धुरीय चिचिंडा वापरला. त्यात शेंगदाणे, नारळ, टोफू आणि कोथिंबीर भरली. तसेच, रस्सा बनवण्यासाठी लिंबू गवत, आले, कोथिंबीरच्या मुळ्या, वॉटर चेस्टनट, एनोकी मशरूम आणि मिरच्या वापरल्या होत्या," असे दीक्षित यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, या जोडप्याने सापाचे मांस नव्हे, तर 'चिचिंडा' हा पदार्थ खाल्ला होता.

अन्य सेलिब्रिटींनाही 'खास' जेवण

याच मुलाखतीत शेफ हर्ष यांनी बॉलिवूडच्या इतर काही सेलिब्रिटींच्या आवडीचे पदार्थही सांगितले. त्यांनी आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांच्यासाठी बनवलेल्या 'रामेन' बद्दलही माहिती दिली. आलिया आणि दीपिका यांना त्यांचे चिकन आणि पोर्क रामेन खूप आवडतात, असेही त्यांनी सांगितले.

हर्ष दीक्षित हे विराट कोहली, अनुष्का शर्मा यांच्यासह आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, शाहिद कपूर, रणबीर कपूर आणि अर्जुन कपूर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींसाठी खाजगी शेफ म्हणून काम करतात. त्यांच्या या खुलाशामुळे विराट-अनुष्का यांनी 'सापाचे मांस' खाल्ल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळालेला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+