ओठ खूपच सेx$%, तुला किस करावेसे वाटते, असित कुमार मोदींवर अभिनेत्रीचे गंभीर आरोप...

देशातील अत्यंत लोकप्रिय टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र, अलीकडेच या शोमध्ये 'श्रीमती रोशन सोधी' ही भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करून मनोरंजनविश्वात खळबळ उडवून दिली आहे.

asit kumar modi allegations marathi

जेनिफर मिस्त्री बन्सीवाल नावाच्या या अभिनेत्रीने एका मुलाखतीत आपल्याला शोच्या सेटवर अनेकदा अस्वस्थ वाटल्याची भावना व्यक्त केली आहे. जेनिफरने सांगितले की, 2018मध्ये शोचे ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांनी तिच्याशी फोनवर अवमानास्पद वर्तन केले होते. त्या वेळी मदतीसाठी ती थेट असित मोदींकडे गेली; मात्र त्यांच्याकडूनही अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप जेनिफरने केला आहे.

तिच्या म्हणण्यानुसार, "मी सोहेलविरोधात तक्रार घेऊन असित मोदींकडे गेले होते. मात्र, त्यांनी उलटपक्षी मला 'तुम्ही फारच आकर्षक दिसता' अशी टिप्पणी केली आणि माझ्यासोबत वागताना मर्यादा ओलांडली." शिवाय, 2022 मध्ये व्हिसा संदर्भात बोलतानाही असित मोदी यांनी फोनवर 'तू रडतेस का? इथे असतीस तर मिठी मारली असती. तुला माझी कधीच पर्वा नसते...' अशा स्वरूपाचे वैयक्तिक संदेश दिल्याचे अभिनेत्रीने उघड केले.

2019 मध्ये सिंगापूरमध्ये झालेल्या शोच्या शूटिंगदरम्यानही असित मोदी यांनी तिला वाईट वागणूक दिल्याचा आरोप जेनिफरने केला आहे. "त्यांनी मला त्यांच्या खोलीत व्हिस्की पिण्यास चल असे म्हटले. इतकेच नव्हे तर, ते माझ्या खूप जवळ आले आणि माझ्या ओठांवर अश्लील टिप्पणी केली," असे तिचे म्हणणे आहे.

या अनुचित वर्तनाचा परिणाम म्हणून जेनिफर मानसिकरित्या खचली होती, असेही ती म्हणाली. जेनिफरच्या दाव्यानुसार, इतर महिला सहकलाकारांशीही असित मोदी अविचाराने संवाद साधत. 'मोनिका भदोरिया' या अभिनेत्रीला त्यांनी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचित्र प्रश्न विचारले, असा आरोपही जेनिफरने केली.

या सर्व प्रकाराबद्दल तिने सहकलाकार मंदार चांदवडकर यांनाही सांगितले होते. परंतु, तिच्या म्हणण्यानुसार, अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही.सध्या या प्रकरणावर शोच्या निर्मात्यांकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही. मात्र, या आरोपांमुळे उद्योगात आणि प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+