Tanushree Dutta:अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गौप्यस्फोट! सुशांतसारखे तिलाही संपविण्याचा या लोकांचा डाव!
Tanushree Dutta Latest Marathi News : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ती अक्षरशः ढसाढसा रडताना दिसली. गेल्या अनेक वर्षांपासून तिला तिच्याच घरात छळ आणि भीतीचा सामना करावा लागत असल्याचा दावा तिने केलाय. त्याचबरोबर तिलाही सुशांत सिंग राजपूरतसारखे संपविण्याचा डाव आखला जात असल्याचा खळबळजनक आरोप तिने केला, या घटनेने बॉलिवूड क्षेत्रात पुन्हा एका खळबळ उडाली आहे.

'सुशांत सिंग राजपूतसारखे मलाही मारण्याचा प्रयत्न...'
व्हिडिओमध्ये तनुश्रीने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली, "मला धोका आहे. सुशांत सिंग राजपूतसारखे मलाही मारण्याचे प्रयत्न होत आहेत." बॉलिवूडमधील काही शक्तिशाली लोक तिच्या मागे लागले असून, तिच्या जीवाला धोका असल्याचे तिने म्हटले आहे. या प्रकरणात तनुश्रीने सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.
Tanushree Dutta’s heartbreaking video is shaking up social media!
— BAHAR ke KALESH💥 (@baharkkalesh) July 23, 2025
In tears, she reveals being harassed in her own home for the past 4-5 years—from thieving maids to constant threats, it’s a real-life drama. #TanushreeDutta even called the police for help!
Drop your thoughts. pic.twitter.com/APe7wKdk4A
बॉलिवूडमधील मोठया लोकांचा तिचा छळ..
काल झालेल्या व्हिडिओ व्हायरल नंतर तनुश्रीने न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या या आरोपांचा पुनरुच्चार केला. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील काही मोठ्या लोकांकडून त्याचा छळ होत असल्याचे आणि तिला अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आल्याचा आरोप समोर आले. पण ते कधीच सिद्ध झाले नाहीत. आता तनुश्रीच्या या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे येणाऱ्या काळातच करणार आहे.
घरातही छळ, पोलिसांचीही मदत नाही?
काल अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये तनुश्रीने तिच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे. ती म्हणाली, "माझ्या स्वतःच्या घरात माझा छळ होत आहे. मी नुकताच पोलिसांना फोन केला आहे. ते आले आणि मला पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल करण्यास सांगितले. कदाचित मी उद्या किंवा परवा जाईन. माझी तब्येत ठीक नाही. गेल्या ४-५ वर्षांपासून मला खूप त्रास दिला गेला आहे."
या छळामुळे तिची तब्येत खूप खराब झाली असून, ती कामही करू शकत नाहीये. घर स्वच्छ राहत नसल्याचं आणि मोलकरीणही ठेवता येत नसल्याचं तिने सांगितलं, कारण ज्या महिलांना कामावर ठेवलं होतं, त्यांनी घरातील वस्तू चोरल्या होत्या. त्यामुळे ती आता स्वतःच सर्व कामं करत आहे. तिने व्हिडिओच्या शेवटी "कृपया मला मदत करा," अशी विनंती केली.
तनुश्री दत्ताने केलेल्या या आरोपांमुळे बॉलिवूडमधील अनेक अनुत्तरित प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फुटली आहे. सरकार आणि प्रशासन यावर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण, तनुश्रीच्या व्हिडिओमुळे मात्र बॉलिवूड क्षेत्रात खळबळ उडाली आहे.












Click it and Unblock the Notifications