तमिळ अभिनेते दिल्ली गणेश यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन, 400 चित्रपटांमध्ये केले होते काम
Delhi Ganesh Passes Away : तमिळ चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिल्ली गणेश यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. ते गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
मुलाने दिली मृत्यूची माहिती
80 वर्षीय अभिनेते दिल्ली गणेश यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सर्व सिनेतारकांनी अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. दिल्ली गणेश यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र महादेवन यांनी दिली आहे. आपल्या इन्स्टा हँडलवर स्टोरी पोस्ट करताना महादेवन म्हणतात - आम्हाला कळवायला खूप दुःख होत आहे की माझे वडील दिल्ली गणेश यांचे 9 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता निधन झाले.

कुटुंब आणि मित्रांना धक्का बसला
दिल्ली गणेश यांच्या अंत्यसंस्काराबद्दल सांगायचे तर, 10 नोव्हेंबरला म्हणजेच आजच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. ही बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांचेही डोळे पाणावले.
400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे
दिल्ली गणेश यांचा जन्म 1 ऑगस्ट 1944 रोजी झाला होता. त्यांनी के. बालचंदर यांच्या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना अनेक मोठ्या आणि नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपटांसोबतच त्याने टीव्ही मालिकांमध्येही आपली प्रतिभा त्यांनी दाखवली आहे.












Click it and Unblock the Notifications