Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सनी लिओनी 'या' सरकारी योजनेची लाभार्थी, मिळतो 1 हजार रुपये महिना! वाचा काय आहे प्रकरण?

Sunny Leone : लाखो लोकांच्या हृदयाची धडकन असलेली सनी लिओनी नेहमी चर्चेत असते. तिचा पुर्वइतिहास पाहता तिचा फॅन फाॅलोअरही मोठा आहे. आता तर ती वेगळ्याच कारणांनी चर्चेत आली आहे. छत्तीसगड सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या महतारी वंदन योजनेमुळे ती सध्या चर्चेत आहे. या योजनेत तिचे नाव लाभार्थ्याच्या यादीत आले आहे.

राजकीय वातावरण तापले

एकीकडे या योजनेवर काँग्रेसने भ्रष्टाचाराचे आरोप लागले आहेत तर सनी लिओनीच्या नावाने असलेल्या लाभार्थी खात्यात चक्क गेल्या दहा महिन्यांपासून एक हजार रुपये मिळत आहे. यामुळे आता या योजनेवरुन वातावरण चांगलेच तापले आहे.

Sunny Leone named bogus beneficiary in Chhattisgarh Mahatari Vandan Yojana
लाभार्थीचं नाव सनी लिओनी अन् पतीचे नाव जॉनी सिन्स!

सनी लिओनीच्या नावाने असलेल्या खात्यात बस्तरमध्ये महतारी वंदन योजनेचा लाभ मिळत आहे. शासनाच्या महतारी वंदन योजनेच्या संकेतस्थळावर तिच्या नावाने लाभार्थी नोंदणीकृत आहे. वेबसाईटवर नोंदणी क्रमांक MVY006535575 टाकल्यावर, लाभार्थीचं नाव सनी लिओनी आहे आणि तिच्या पतीचे नाव जॉनी सिन्स आहे. योजना सुरू झाल्यापासून, खात्यात दर महिन्याला एक हजार रुपये जमा केले जात आहेत.

दिवाळीत डिस्काउंटच्या फंदात पडू नका, बनावट साइट्सवर बसेल गंडा, सुरक्षित ऑनलाइन शॉपिंग कशी कराल? वाचा

सनी लिओनीच्या खात्यात पैसे जात होते का?

आर्थिक दृष्टा संपन्न असलेली अभिनेत्री सनी लिओनी हिच्याकडे पैशांची कमी नाही पण तिचे नाव जर एक हजार रुपये मानधन मिळत असलेल्या योजनेत येणे ही आश्चर्याची गोष्ट आहे. तिच्या नावाने बनावट गोष्टींचा अवलंब करुन कोण लाभ घेत आहे. याचा सूत्रधार कोण, हा तपासाचा भाग आहे.

बनावट नावं समोर येताच काँग्रेसची सरकारवर टीका

बनावट नावं समोर आल्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दीपक बैज यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. छत्तीसगडच्या माता-भगिनींच्या नावावर महतारी वंदनच्या नावाखाली सरकार मोठी भूमिका बजावत आहे, याची आम्हाला सुरुवातीपासूनच जाणीव होती.

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना योग्य मग झारखंडमध्ये बोगस कशी? संजय राऊतांचा पीएम मोदींवर निशाणा

काँग्रेसला भाजपचे उत्तर

महतारी वंदनाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्यामुळेच अशी प्रकरण समोर येत आहेत. दीपक बैज यांच्या वक्तव्यावर भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. भाजप आमदार सुशांत शुक्ला म्हणाले "छत्तीसगड सरकारची महतारी वंदन योजना हे ऐतिहासिक पाऊल आहे. काँग्रेस घाबरली आहे त्यामुळेच अशी विधानं करत आहेत. बस्तर परिसरात विसंगती आहे. अभिनत्रीच्या नावावर पैसे काढले जात आहेत. याची चौकशी केली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+