स्मिता पाटील सिनेसृष्टीला पडलेले सोनेरी स्वप्न! जाणून घ्या जीवन आणि 31 व्या वर्षी का झाला मृत्यू?
Smita Patil Career, Awards, Films Personal Life in Marathi : भारतीय सिनेसृष्टीत अगदी कमी वयात दैदीप्यमान कामगिरी करणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिता पाटील हे भारतीय चमचमत्या सिनेसृष्टीला पडलेलं सोनेरी स्वप्न होय. अगदी दुरदर्शन निवेदिका ते प्रसिद्ध अभिनेत्री असा त्यांचा प्रवास आहे. मराठी सिनेमाजगतातसोबतच हिंदी सिनेजगतात सर्वात कमी वयात सर्वात यशस्वी आणि तारका स्मिता पाटील होत्या.
अवघे 31 वर्ष आयुष्य वाट्याला आलेल्या स्मिता पाटील यांनी या छोट्या इनिंगमध्येही भरभरुन कामगिरी केली. त्या आजही रसिकांच्या मनात आहेत. आपण आज स्मिता पाटील यांचे करीअर आणि त्यांचा मृत्यू कसा झाला हे जाणून घेणार आहोत.

स्मिता पाटील यांचा पुण्यात जन्म
स्मिता पाटील यांचा पुण्यात 1955 ला जन्म झाला होता. महाराष्ट्रातील राजकारणी शिवाजीराव गिरधर पाटील आणि समाजसेविका विद्याताई पाटील यांच्या त्या कन्या. मूळ खान्देशातील शिरपूर येथील त्यांचे कुटुंब असून स्मिता पाटील यांनी बालपणापासून नाटकात काम केले होते.
स्मिता यांनी पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेतून शिक्षण घेतले, नंतर बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये साहित्याचा अभ्यास केला. त्या पुण्यातील स्थानिक थिएटर ग्रुप्समध्ये देखील सहभागी असायच्या आणि त्यांनी बराचसा काळ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII च्या कॅम्पसमध्ये घालवला होता. 1969 मध्ये त्या मुंबईकर झाल्या.

80 हून अधिक चित्रपटात काम, राज बब्बर यांच्याशी विवाह
स्मिता यांनी त्यांच्या जेमतेम एक दशकभराच्या कारकिर्दीत 80 हून अधिक हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, मल्याळम् आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचा विवाह अभिनेता राज बब्बर यांच्याशी झाला होता. त्यांना प्रतीक बब्बर हा मुलगा आहे. चित्रपट अभिनेता असून त्याने 2008 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
चरणदास चोर चित्रपटातून पदार्पण
स्मिता पाटील यांनी श्याम बेनेगल यांच्या चरणदास चोर (1975) चित्रपटातून पदार्पण केले होते. स्मिता या त्यावेळी भारतीय सिनेमातील नवीन प्रवाहाची चळवळ असलेल्या समांतर सिनेमाची एक आघाडीची अभिनेत्री बनल्या होत्या. तरीही त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्येही त्या दिसल्या. त्यांच्या अभिनयाची खूपवेळा प्रशंसा झाली आणि त्यांनी चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारल्या.

स्मिता पाटील यांचे या चित्रपटात उल्लेखनिय काम
चरणदास चोर, सामना, निशांत, मंथन, जैत रे जैत, भूमिका, सर्वसाक्षी, गमन, आक्रोश, चक्र, निमकहलाल, शक्ती, अर्थ, उंबरठा, मंडी, अर्धसत्य, मेरे साथ चल या चित्रपटात स्मिता पाटील यांनी उल्लेखनिय काम केले आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिका अजरामर झाल्या आहेत.
समाजप्रधान चित्रपटात काम
अभिनयाव्यतिरिक्त स्मिता या सक्रिय स्त्रीवादी आणि मुंबईतील महिला केंद्राच्या सदस्या होत्या. महिलांच्या समस्यांच्या प्रगतीसाठी त्या मनापासून वचनबद्ध होत्या. पारंपारिक भारतीय समाजातील महिलांची भूमिका, त्यांची लैंगिकता आणि शहरी वातावरणात मध्यमवर्गीय महिलांना तोंड देत असलेल्या बदलांचा शोध घेणाऱ्या चित्रपटांमधून त्यांनी काम केले.
पद्मश्रीसह 2 राष्ट्रीय, 1 फिल्मफेअर पुरस्कार
स्मिता पाटील यांच्या कारकिर्दीत त्यांना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1085 मध्ये स्मिता यांना अवघ्या वयाच्या तिसाव्या वर्षी पद्मश्री हा भारताच्या चौथा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना मिळाला होता. स्मिता यांच्या स्मरणार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे अजूनही "स्मिता पाटील पब्लिक स्कूल" ही शाळा चालवली जाते.

फोटो क्रेडीट - विकिपिडीया
स्मिता पाटील यांचा कशामुळे मृत्यू?
चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून उत्कृष्ट काम करणाऱ्या स्मिता पाटील या सर्वकालीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. स्मिता पाटील यांचा मुंबईत 13 डिसेंबर 1986 रोजी मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे वय अवघे 31 वर्ष होते. बाळंतपणाच्या गुंतागुंतीमुळे (प्युरपेरल सेप्सिस) मुळे त्यांचा मृत्यू झाला. प्रियदर्शनी अकादमीने 1986 मध्ये या ज्येष्ठ अभिनेत्रीला श्रद्धांजली म्हणून स्मिता पाटील स्मृती पुरस्कार सुरू केला, अशा या भारतीय सिनेमातील अजरामर झालेल्या मराठमोळी अभिनेत्री त्यांचा चेहरा आजही डोळ्यासमोर उभा राहतो.












Click it and Unblock the Notifications