शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर 6 दिवसांनी ‘खास' मित्राचा धक्कादायक खुलासा, समोर आलं धक्कादायक...
टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिने 27 जून 2025 रोजी या जगाला अलविदा म्हटले. 42 वर्षांच्या वयात कार्डियाक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण इंडस्ट्री आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

एंटी-एजिंग औषधांमुळे धोकादायक परिणाम?
माध्यमांतील वृत्तानुसार, शेफाली जरीवालाने उपाशीपोटी काही विशेष औषधांचे सेवन केले होते. या औषधांचा संबंध एंटी-एजिंग म्हणजेच वृद्धत्व रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपचारांशी होता. त्यामुळे तिच्या मृत्यूच्या संभाव्य कारणांवर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
रोनित रॉयचा भावनिक खुलासा
दरम्यान, शेफाली जरीवालाचे मित्र आणि सहकलाकार रोनित रॉय यांनी तिच्या मृत्यूनंतर NDTV शी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "ही अत्यंत वेदनादायक बातमी आहे. मी तिच्या पतीसोबत (पराग त्यागी) काम केले आहे. तो फारच चांगला माणूस आहे."
"शेफालीचं जाणं मनाला चटका लावणारं"
रोनित रॉय पुढे म्हणाले, "मी शेफाली आणि पराग यांना अनेकदा भेटत होतो. कधी एखाद्या कार्यक्रमात, तर कधी एकत्र डिनरला. ते दोघंही खूप गोड जोडपं होतं. इतक्या लहान वयात तिचं जाणं फार दुःखद आहे."
सोशल मीडियावर एंटी-एजिंगवर चर्चा
शेफालीच्या मृत्यूनंतर तिच्या एंटी-एजिंग ट्रीटमेंटबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही रिपोर्ट्सनुसार, ती बराच काळ या उपचारांखाली होती. यामुळे या उपचारांची सुरक्षितता आणि संभाव्य धोके यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
"गैरसमज पसरवू नका" - रोनित रॉय
शेफालीच्या मृत्यूप्रकरणी अनेक अपप्रचार आणि षड्यंत्राच्या थिअरीज पसरवल्या जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना रोनित रॉय म्हणाले, "कोणतीही खात्रीशीर माहिती नसताना एखाद्याच्या खाजगी आयुष्याबद्दल अटकळ बांधणे चुकीचे आहे. अशा प्रसंगी आपल्याला सहानुभूती आणि सन्मान दाखवायला हवा."
ते पुढे म्हणाले, "आपण डॉक्टर नाही आहोत. त्यामुळे मृत्यूचे खरे कारण काय हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही. अशा गोष्टींवर सार्वजनिकपणे चर्चा करणं टाळलं पाहिजे."
"व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम युनिव्हर्सिटीजचा त्रास"
रोनित रॉय म्हणाले, "आजकाल व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर दोन 'युनिव्हर्सिट्या' चालतात. एकाच घटनेवर 10-12 थिअरीज तयार होतात, पण सत्य कुणालाही माहित नसतं. हे दुर्दैवी आहे. एखाद्याचा मृत्यू झाला असताना, सर्वप्रथम त्या व्यक्तीला सन्मान द्यावा लागतो."
शेफाली जरीवालाची शेवटची चॅट झाली व्हायरल
शेफालीच्या मृत्यूनंतर तिचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यात तिची शेवटची व्हॉट्सॲप चॅटही समोर आली आहे. ही चॅट तिच्या खास मित्र आणि अभिनेता विशाल सिंग याच्याशी झालेली होती.
विशाल सिंगने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेफालीसोबत शेवटची व्हॉट्सॲप चॅट शेअर केली आहे. चॅटमध्ये ते एकमेकांना भेटण्याची योजना आखत होते, असे दिसून येते. शेफालीचा नंबर विशालच्या फोनमध्ये 'जरी' या नावाने सेव्ह केलेला होता.












Click it and Unblock the Notifications