Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गरोदर आहे की केवळ पैसे कमावण्यासाठी?, 'या' अभिनेत्रीने का केले घाईगडबडीत लग्न; जाणून घ्या सत्य काय?

Actress Hina Khan Latest News : अभिनेत्री हिना खान बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. त्यामागे प्रमुख कारण म्हणजे तिच्या स्तनाच्या कर्करोगामुळे. तिने आजारासंदर्भात तिचा संपूर्ण प्रवास चाहत्यांसह शेअर केला. या दरम्यान, अभिनेत्रीला चाहत्यांकडून खूप सारे प्रेम मिळाले. दरम्यान, अभिनेत्रीने लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.

हिना खानने 4 जून रोजी लग्नाचे फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. कारण त्यांच्या लग्नाबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. हिना आणि रॉकी गेल्या 13 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दरम्यान, जेव्हा जेव्हा या जोडप्याला लग्नाबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी सांगितले की, ते सध्या आनंदी आहेत आणि त्यांचा असा कोणताही प्लॅन नाही.

परंतु, त्यांच्या काही दिवसांतच लग्नाचे फोटो समोर आले. परंतु, त्यांनी अतिशय घाईगडबडीत लग्न का केले, यावर आता चर्चा रंगली आहे. ती गर्भवती होती का, का तिला आणि तिच्या पतीला भरपूर पैसे कमवायचे होते म्हणून त्यांनी त्वरीत लग्नाचा निर्णय घेतला, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Hina Khan

'पती पत्नी और पंगा' मध्ये एकत्र दिसणार

अशा परिस्थितीत, जेव्हा हिना आणि रॉकी यांनी कोर्टात लग्न केले तेव्हा चाहत्यांना आनंदासोबतच थोडा धक्काही बसला. त्यानंतर, लग्नाच्या 10 दिवसांनी हिना आणि रॉकीला 'पती पत्नी और पंगा'च्या सेटवर पाहिले गेले. यादरम्यान, हिना खान गुलाबी रंगाच्या पोशाखात दिसली, ज्यामध्ये तिचे पोट थोडे बाहेर आलेले दिसत होते. त्यामुळे ती गर्भवती असल्याची चर्चा देखील चाहत्यांनी सोशल मीडियावर सुरू केली.

हिना खान गर्भवती आहे का?

त्यानंतर, लोक म्हणू लागले की हिना खान गर्भवती आहे, म्हणूनच तिने घाईघाईत रॉकीशी लग्न केले. त्याच वेळी, काही लोकांनी असेही म्हटले की ती कर्करोगाशी झुंज देत आहे आणि औषधांमुळे तिचे शरीर सुजले आहे. तथापि, अभिनेत्रीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

शोचा टीआरपी वाढेल का?

हिना आणि रॉकीचे लग्न होऊन आता एक महिना झाला आहे, परंतु गरोदरपणाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अशा परिस्थितीत, आता असा अंदाज लावला जात आहे की हिना आणि रॉकीने 'पती पत्नी और पंगा' या रिअॅलिटी शोमुळे घाईघाईत लग्न केले.

हे देखील शक्य आहे की शोच्या निर्मात्यांनी हिना आणि रॉकीला हे करण्यास सांगितले असेल आणि त्यांना मोठी रक्कम दिली असेल जेणेकरून 'पती पत्नी और पंगा'चा टीआरपी वाढेल.

चाहते शो-बद्दल अधिक उत्साही!

कारण, चाहते हिना आणि रॉकीला बऱ्याच काळापासून पती-पत्नी म्हणून पाहू इच्छित होते. आता जेव्हा हे जोडपे पती-पत्नी म्हणून शोचा भाग होणार आहे, तेव्हा चाहते त्याबद्दल खूप उत्सुक असतील हे स्पष्ट आहे. यामुळे शोचा टीआरपी वाढेल आणि शोच्या निर्मात्यांना फायदा होईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+