पाच कोटी दे नाहीतर मंदिरात येऊन माफी माग! सलमान खानला पुन्हा लाॅरेन्स बिष्णोई गँगकडून धमकी!
Salman Khan again threatened by Lawrence Bishnoi Gang : सलमान खानच्या मागचे शुक्लकाष्ट संपता संपेना, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्यानंतर महाराष्ट्रासह सिनेजगतही हादरले. या हत्येची जबाबदारी लाॅरेन्स बिष्णोई गँगने घेतली होती. यानंतर सलमान खानला धमकीचे सत्र सुरु झाले होते, आता पुन्हा बिष्णोई गँगकडून सलमान खानला धमकी मिळाली आहे. पाच कोटी दे नाहीतर मंदिरात जाऊन काळवीट मारल्याप्रकरणी माफी माग अशी ही धमकी आहे.
मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल युनिटला सोमवारी एका व्यक्तीकडून संदेश आला, यामध्ये आपण गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा मॅसेंजरने केला होता, त्याने सलमान खानच्या काही मागण्या पूर्ण न केल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

काळवीट हत्या प्रकरण
सलमान खानला या महिन्यात काही धमक्या मिळाल्या. यात ही आजची नवी धमकी मिळाली आहे. बॉलीवूड अभिनेत्याने एकतर मंदिरात जाऊन काळवीट मारल्याबद्दल माफी मागावी, असे या धमकीत म्हटले आहे. असे न केल्यास पाच कोटी रुपये भरा. काही वर्षांपूर्वी काळवीट मारल्याच्या आरोपातून बॉलिवूड अभिनेता सलमान खानची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र, हे वर्ष जुने प्रकरण अजूनही संपलेले नाही. काळ्या हरणाला मानणारा बिष्णोई समाज सलमान खानने माफी मागावी अशी मागणी करत आहे.
मंदिरात माफी मागावी नाहीतर पाच कोटी दे..!
"सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या (बिष्णोई समाजाच्या) मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा 5 कोटी रुपये द्यावेत. जर त्याने असे केले नाही तर आम्ही त्याला ठार मारू, आमची टोळी अजूनही सक्रिय आहे," असा संदेश या संदेशात होता.
कुणी दिली धमकी पोलिसांकडून शोध
सलमानला मिळालेल्या धमकीनंतर पुन्हा खळबळ माजली आहे. या धमकीच्या मेसेजचा शोध पोलिस घेत आहेत आणि सलमान खानसाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसह विविध आरोपांखाली तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईशी या संदेशाचा संबंध आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत.
वृत्तसंस्था एएनआयने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, "अभिनेता सलमान खानला मिळालेल्या धमकीबाबत वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या क्रमांकावरून हा संदेश आला आहे त्याचा शोध घेतला जात आहे." आता या धमकीमुळे पुन्हा सलमानखानच्या सुरक्षिततेसंदर्भात मोठी कार्यवाही केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications