Saiyyara box office collection: सहाव्या दिवशीही सैय्याराचा जादू! आज एवढी झाली कमाई, जाणून घ्या
Saiyyara box office collection : नवखे कलाकार असतानाही मोहित सुरी दिग्दर्शित सैय्यारा चित्रप चांगलाच भाव खात आहे. रसिकांना हा चित्रपट भावला असून सध्या हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे. १८ जुलैला हा चित्रपट देशातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आज सहावा दिवस पुर्ण झाले आहेत. विकेंडला बहुतांश चित्रपट चांगला गल्ला जमवतात पण सैय्याराची खासीयत ही की हा चित्रपट सोमवार ते शुक्रवार या काळातही जोरदार कमाई करताना दिसत आहे.

६ दिवसात १५० कोटींचा गल्ला
सैकनिल्क रिपोर्टचा हवाला देत वनइंडिया हिंदीने वृत्त दिले की, आज सहाव्या दिवशी या चित्रपटाने जवळपास २१ कोटी रुपये कमावले आहेत. आता या चित्रपटाती एकूण ६ दिवसांची कमाई तब्बल १५० कोटींवर पोहचली आहे.
चित्रपटाच्या कमाईचे यश काय?
लोक आता सांगत आहेत की, सैय्याराने अपेक्षेपेक्षा खूपच सरस कमाई केली असून हा चित्रपट मीड इयरमधील ब्लाॅकबस्ट ठरु शकते असा अंदाजही लावला जात आहे. नवख्या स्टार्सना घेऊन हा चित्रपट पुर्ण केला गेला आणि आता अवघ्या सहा दिवसात १५० कोटी रुपयांवर कमाई कशी झाली याचे लोकांना आश्चर्य वाटत आहे. त्याचे सांगायचे तर माऊथ पब्लिसीटी आणि युवा वर्गाला हा चित्रपट भावलेला आहे. प्रोफेशनल प्रमोशनशिवाय हा चित्रपट वन टू वन एकमेकांना पाहण्यासाठी सजेस्ट केला जात आहे हेही लक्षात घ्यावे लागेल.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सैय्याराची भुरळ
सैय्याराने तरुणाईला वेड लावले असेच म्हणावे लागेल. हा चित्रपट तरुणाईवर गारुड करताना दिसत आहे. कारण सिनेमागृहात तरुण आणि महाविद्यालयीन वर्गच जास्त दिसत आहे.
अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा अभिनय असलेला सैय्यारा या वर्षीचा पाचवा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. खरंतर सांगायचे झाल्यास या चित्रपटाचे पुर्ण बजेट ६० कोटी रुपये आहे, आणि हा चित्रपट जवळपास २०० कोटींचा नफा मिळवू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. आताच हा सिनेमा १५० कोटींवर पोहचला असून ९० कोटींचा नफा आताच डोळ्यासमोर दिसत आहे. अजून तर शनीवार आणि रविवार हे विक डेसुद्धा बाकी आहेत, त्यामुळे २०० कोटींचा आकडा हा सिनेमा सहज पार करु शकतो.
सहा दिवसांतील चित्रपटाची कमाई किती?
- पहिला दिवस - २१.५ कोटी रुपये
- दिवस दुसरा - २६ कोटी रुपये
- दिवस तिसरा - ३५.७५ कोटी रुपये
- दिवस चौथा - २४ कोटी रुपये
- दिवस पाचवा - २५ कोटी रुपये
- दिवस सहावा - २१
- एकूण - १५३.२५ कोटी रुपये












Click it and Unblock the Notifications