Saiyaara movie release: बाॅक्स ऑफिसवर ‘सैयारा'चा बोलबाला! आज झाला रिलीज, कसा आहे चित्रपट? जाणून घ्या
Saiyaara movie release review in Marathi : बॉलिवूडचा हुरहुन्नरी दिग्दर्शक मोहित सूरी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सैयारा' आज, १८ जुलै २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती आणि आता चित्रपटगृहांमध्येही तो अपेक्षा पूर्ण करताना दिसत आहे. मोहित सूरी यांनी 'आशिकी २' आणि 'एक व्हिलन' सारखे खास चित्रपट तयार केले आहेत.यावेळी नवीन चेहरे असलेला अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी अभिनयाचा साज चढवलेला हा चित्रपट रसिकांना भावले की नाही हे लवकरच समजेल.

पहिल्या दिवशी किती मिळवेल गल्ला?
चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जोरदार कमाई केली आहे. हे विशेष आहेच पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सैयारा'ने प्रदर्शनापूर्वीच १.९० लाखांहून अधिक तिकिटे विकली होती. मार्केट तज्ज्ञांच्या मते, हा चित्रपट मोहित सूरींच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या ओपनिंग डे चित्रपटांपैकी एक ठरू शकतो. पहिल्या दिवशी १८-२० कोटी निव्वळ कमाईचा अंदाज वर्तवला जात आहे. नवोदित स्टारकास्टंना घेऊन हा चित्रपट तयार करण्यात आला जर या चित्रपटाने गल्ला जमवला तर ही एक अफलातून कामगिरीच समजली जाईल.
कसा आहे 'सैयारा' चित्रपट? ४ पाॅईंटमध्ये समजून घ्या
- 'सैयारा' हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे.
- सैयारा प्रेम, यातना, काळानुरुप नातेसंबंधांच्या भावनेला स्पर्श करतो.
- प्रेमाच्या धागा अन् प्रेमाच्याच गाभ्याला हात घालणारा हा चित्रपट आहे.
- प्रेम भंगातून सावरत आणि पुन्हा प्रेमात पडताना काय काय होतं हे चित्रपटात आहे.
नव्या चेहऱ्यांची प्रभावी कामगिरी..
अनन्या पांडेचा चुलत भाऊ असलेला अहान पांडे आणि अनित पड्डा हे दोन नवे कलाकार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. दोघांच्याही अभिनयाचे प्रचंड कौतुक होत आहे. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही त्यांच्या अभिनयाला नवखे पण भावणारे कलाकार असे म्हटले आहे. पदार्पण करणाऱ्या जोडीसाठी हे यश खूप मोठे आहे असेच म्हणावे लागेल. अहानची पडद्यावरील उपस्थिती आणि अनितचा भावनिक अभिनय या चित्रपटाची ताकद आहे. त्यांची केमिस्ट्री खूपच सहज आणि प्रभावी आहे.
मोहित सूरींच्या या चित्रपटांत चित्रपटाचे संगीत हे त्याच्या सर्वात मोठ्या जमेच्या बाजूंपैकी एक आहे. मिथुन, सचिन-परंपरा, विशाल मिश्रा, तनिष्क बागची आणि इतरांनी दिलेले संगीत आत्म्याला भिडणारे आणि कर्णमधुर आहे. 'धुन' हे शीर्षकगीत आधीच लोकप्रिय झाले आहे आणि पडद्यावर ते पाहणे एक जादुई अनुभव आहे. संगीतामुळे कथेला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे.
एकंदरीतच कसा आहे चित्रपट?
'सैयारा' हा केवळ एक प्रेम कथा नाही, तर तो भावना, वेदना आणि कालातीत नात्यांचा प्रवास आहे. मोहित सूरींनी पुन्हा एकदा प्रेमाचे विविध पैलू अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर आणले आहेत. अहान आणि अनित यांचा दमदार अभिनय, हृदयस्पर्शी संगीत आणि सशक्त कथानक यामुळे हा चित्रपट पैसे वसूल मनोरंजन करतो. रोमान्स आणि संगीताची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी 'सैयारा' हा नक्कीच आठवणीत राहणारा सिनेमा ठरु शकतो.












Click it and Unblock the Notifications