Saiyaara Box Office Collection: तरुणाईला भावला 'सैय्यारा' जाणून घ्या 5 व्या दिवशी किती मिळवला गल्ला?
Saiyaara Box Office Collection Day fifth : सैय्यारा हा मोहित सुरी दिग्दर्शित चित्रपट 18 जुलै रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे. पाच दिवसांमध्ये या चित्रपटाने जवळपास 132 कोटी रुपये यांचा गल्ला जमवला आहे. प्राप्त माहिती नुसार आणि इंडस्ट्री ट्रॅक्टर सेकंड सैकनिल्कच्या अहवालानुसार सयाराने आज 23 जुलैपर्यंत रिलीजच्या पाचव्या दिवशी मंगळवारी जवळपास 25 कोटी रुपये कमाई केली आहे.
बॉलिवूडचा हुरहुन्नरी दिग्दर्शक मोहित सूरी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सैयारा' आज, 18 जुलै 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती आणि आता चित्रपटगृहांमध्येही तो अपेक्षा पूर्ण करताना दिसत आहे.

अन् भाकित खरे ठरले
सय्यारा चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जोरदार कमाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सैयारा'ने प्रदर्शनापूर्वीच 1.90 लाखांहून अधिक तिकिटे विकली होती. मार्केट तज्ज्ञांच्या मते, हा चित्रपट मोहित सूरींच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या ओपनिंग डे चित्रपटांपैकी एक ठरेल आणि पहिल्या दिवशी 18-20 कोटी निव्वळ कमाईचा अंदाज वर्तवण्यात आला. आता हे भाकित खरे ठरले असून पहिल्याच दिवशी या चित्रपचटाने तब्बल 21 कोटींचा गल्ला जमावला आहे. नवोदित स्टारकास्टंना घेऊन हा चित्रपट तयार करण्यात आला आणि या चित्रपटाने गल्ला जमवणे ही खूपच मोठी कामगिरीच समजली जात आहे.
प्रदर्शित झाल्यापासून एकूण पाच दिवसांची चित्रपटाची कमाई वाचा
- पहिला दिवस - 21.5 कोटी रुपये
- दिवस दुसरा - 26 कोटी रुपये
- दिवस तिसरा - 35.75 कोटी रुपये
- दिवस चौथा - 24 कोटी रुपये
- दिवस पाचवा - 25 कोटी रुपये
एकूण - 132.25 कोटी रुपये
'सैयारा' कसा आहे चित्रपट?
- 'सैयारा' हा केवळ एक प्रेम कथा नाही, तर तो भावना, वेदना आणि कालातीत नात्यांचा प्रवास आहे. मोहित सूरींनी पुन्हा एकदा प्रेमाचे विविध पैलू अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर आणले आहेत.
- 'सैयारा' हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. सैयारा प्रेम, यातना, काळानुरुप नातेसंबंधांच्या भावनेला स्पर्श करतो. प्रेमाच्या धागा अन् प्रेमाच्याच गाभ्याला हात घालणारा हा चित्रपट आहे.
- अहान आणि अनित यांचा दमदार अभिनय, हृदयस्पर्शी संगीत आणि सशक्त कथानक यामुळे हा चित्रपट पैसे वसूल मनोरंजन करतो.
- प्रेम भंगातून सावरत आणि पुन्हा प्रेमात पडताना काय काय होतं हे चित्रपटात आहे. रोमान्स आणि संगीताची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी 'सैयारा' हा नक्कीच आठवणीत राहणारा सिनेमा ठरु शकतो.












Click it and Unblock the Notifications