सैय्यारा ठरला ब्लाॅक बस्टर, आमिर, अक्षयकुमारलाही वाटेल हेवा! दहा दिवसांत किती केली कमाई जाणून घ्या

Saiyaar box office collection : 'सैयारा'ला सिनेमागृहात जबरदस्त प्रतिसाद लाभला असून या चित्रपटाने चार चाँद लावले आहेत. जवळपास दहा ते अकरा दिवसांपर्यंत या चित्रपटाची कमाई डोळे विस्फारतील अशीच आहे. या चित्रपटाने रिलीज होण्याआधीपासूनच प्रचंड कमाई सुरूकेली, हे कलेक्शन पाहून आता बड्या स्टार कास्ट मंडळींनाही हेवा वाटू शकतो कारण, या चित्रपटात नवखे स्टार आहेत.

'सैयारा' चित्रपटाचा प्रभाव आणि युवा वर्गातील उत्साह दिवसेंदिवस वाढतच आहे. स्टार पॉवरशिवाय चित्रपटाने २४७ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. याशिवाय, चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहेत. हा चित्रपट आता ब्लाॅकबस्टर ठरला असून दहा दिवसानंतर अकराव्या दिवशीही या चित्रपटाची जादू कायम आहे.

Saiyaar box office collection


अहान पांडे आणि अनित पद्ढा यांचा चित्रपट रसिकांना चांगलाच खिळवून ठेवत आहे. चित्रपटाने दुसऱ्या रविवारी म्हणजेच विकेंडच्या दिवशी तब्बल ३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे आठवड्याच्या शेवटी सुटीच्या दिवशी चित्रपटाचा उत्साह असतोच पण सप्ताहातील ऐन कामाच्या दिवसांतही या चित्रपटाने प्रचंड कमाई केली आहे.

Take a Poll

मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटाने रसिकांच्या मनावर खासकरुन युवा वर्गावर गारुड केले आहे. सैयारा' ने ब्लॉकबस्टर कलेक्शन चालूच असून नवव्या आणि दहाव्या दिवशी नवा विक्रम रचला" गेल्या दहा दिवसांत या चित्रपटाने किती कमाई केली आहे हे आपण जाणून घेऊया.

चित्रपटाची दहा दिवसांची कमाई

  • पहिला दिवस - 21.5 कोटी रुपये
  • दुसरा दिवस - 26 कोटी रुपये
  • तिसरा दिवस - 35.7 कोटी रुपये
  • चौथा दिवस - 24 कोटी रुपये
  • पाचवा दिवस - 25 कोटी रुपये
  • सहावा दिवस - 21.5 कोटी रुपये
  • सातवा दिवस - 19 कोटी रुपये
  • आठवा दिवस - 18 कोटी रुपये
  • नववा दिवस - 26.5 कोटी रुपये
  • दहावा दिवस - 30 कोटी रुपये
  • एकूण 247.25 कोटी रुपये

मार्केटतज्ज्ञांच्या अंदाजापलिकडे कमाई

सैय्यारा या चित्रपटाची कमाई बाजारतज्ज्ञांच्या अंदाजापलिकडे आहे. यात व्यापारतज्ज्ञ आणि वितरक खूप आनंदी आहेत. कारण बऱ्याच काळानंतर, एक असा चित्रपट आला आहे जो पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी खेचत आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन एका आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. असे असूनही, चित्रपटाच्या शोची व्याप्ती जबरदस्त राहिली आहे.

दोनशेचा टप्पा ओलांडला आता तिनशे कोटींकडे वाटचाल

बाजारतज्ज्ञांच्या अंदाजानुसार या चित्रपटाने भारतात दोनशे कोटी कमावले आहेत, पण त्याही पलिकडे जात हा चित्रपट आता ३०० कोटींवर पोहचू शकतो अशी दाट शक्यता आहे. या चित्रपटाे बाजार तज्ज्ञांच्या अंदाजापलिकडे आर्थिक बाबीत कामगिरी केल्याचे दिसते. या आठवड्यात अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २' प्रदर्शित होत आहेत. चित्रपटाला अजूनही कमाईसाठी ३ दिवसांचा अवधी आहे. जर कमाईचा हाच दर कायम राहिला तर चित्रपट सहजपणे ३०० कोटी क्लबमध्ये सामील होईल.

आमिरच्या चित्रपटाला टाकले मागे

सैय्याराने जगात या चित्रपटाने आतापर्यंत २७० कोटींच्या पुढे गेला आहे. खास बाब म्हणजे सैयाराने प्रथम आमिर खानच्या 'सितार जमीन पर' ला मागे टाकले. त्यानंतर अजय देवगणचा 'रेड २' ला मागे टाकले. त्यानंतर, त्याने अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५' च्या कलेक्शनलाही मागे टाकले. एवढेच नाही तर, कार्तिक आर्यनच्या हिट चित्रपट 'भूल भुलैया २' च्या आयुष्यभराच्या कलेक्शनलाही याने खूप मागे टाकले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+