बापरे..! सैफवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय कट? पोलिसांच्या कोर्टातील दाव्याने भुवया उंचावल्या

सैफवर चाकूहल्ला करणाऱ्या मोहम्मद शेहजाद याला पोलिसांनी अटक केली. त्याला आज वांद्रे येथील न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आज पोलिसांनी कोर्टापुढे अनेक गंभीर मुद्दे मांडल्यामुळे सैफवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे का, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी हेच न्यायलयात सांगितले.

Saif Ali Khan

१६ जानेवारीला झाला हल्ला

अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या मध्यरात्री राहत्या घरी चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर सैफ अली खानला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.

पोलिसांचा दावा काय?

पोलिसांनी मोहम्मद शेहजाद या आरोपीला आज बांद्रातील हाँलिडे कोर्टात हजर केले. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीचं वकीलपत्र घेण्यासाठी वकिलांमध्ये रस्सखेच पाहायला मिळाली. दोन वकील स्वत:हून पुढे आले. न्यायालयानं दोन्ही वकिलांना आरोपीची बाजू मांडण्याची परवानगी दिली. युक्तिवादाच्या वेळी सैफ अली खानवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकतो असा दावा पोलिसांनी केला. न्यायालयानं देखील याबाबत संशय व्यक्त केला.

पोलिसांचे म्हणणे काय?

वांद्यातील कोर्टात आज दोन्ही बाजुनं जोरदार युक्तिवाद झाला. सुनावणीदरम्यान पोलिसांनी आरोपीबाबत माहिती देताना न्यायालयात म्हटलं की, आरोपी भारतात अवैधरित्या वास्तव्य करत आहे. त्याने सैफ अली खान यांच्या घरात प्रवेश करून तिघांना जखमी केलेलं आहे. इथे त्याला कोणी मतद केली आहे का? हे शोधायचे आहे. याशिवाय आरोपीकडे हल्ला केलेला चाकू आहे तोही शोधायचा आहे. त्याने बदललेले कपडे लपून ठेवले आहेत, तेही शोधायचे आहेत. त्यामुळे आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तीवाद पोलिसांनी केला.

आरोपींचे वकील काय म्हणाले?

त्यानंतर आरोपींच्या वकीलांनीही प्रतिप्रश्न विचारले. एका अभिनेत्याच्या घरी हा प्रकार झाला म्हणून आज हे प्रकरण मीडियाने उचलून धरले आहे. या जागी एखाद्या सामांन्याच्या घरी हा प्रकार घडला असता, तर त्याला तेवढं महत्व प्राप्त झाल नसतं, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची कोठडी सुनावली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+