Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Adinath Kothare: रणबीर कपूरच्या रामायणमध्ये आदिनाथ कोठारे साकारणार ही महत्त्वाची भूमिका, जाणून घ्या

Ranbir Kapoor's Film Ramayana : आगामी यश आणि साई पल्लवी अभिनिती रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटातील कलाकारांपासून ते हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार इथपर्यंत लोक आता विचारत आहेत. या चित्रपटाबद्दल आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये प्रसिद्ध मराठी सिनेस्टार महेश कोठारेंचा मुलगा आणि मराठी स्टार आदिनाथ कोठारे हा झळकणार आहे.

आदिनाथ कोठारे हा मराठी हुरहुन्नरी कलाकार आहेच, पण त्याने आतापर्यंत अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे तो बालकलाकारही आहे. त्याची माझा छकुला या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारेंबरोबरची भूमिका लक्षात राहण्यासारखी आहे.

Ranbir Kapoor s Film Ramayana

आदिनाथ कोठारे 'रामायण'मध्ये ही भूमिका साकारणार

रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी अभिनीत 'रामायण' चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटात मराठी कलाकार झळकणार म्हटल्यावर आता आणखीनच या चित्रपटाबद्दल रसिकांना आस्था वाटत आहे. खास बाब म्हणजे मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे या चित्रपटात भगवान रामाचा भाऊ भरतची भूमिका साकारणार आहे. त्याने स्वतः या चित्रपटात आपण असल्याचे स्पष्ट केले आहे. आदिनाथ कोठारेला मुख्य सहकलाकाराची भूमिका मिळणार आहे.

आदिनाथ कोठारेची भूमिका आणि अनुभव

आदिनाथ कोठारे 'रामायण'मध्ये भरत हे महत्त्वाचे पात्र साकारणार आहे. भरत हे भगवान रामाचा धाकटा भाऊ असून, तो नेहमीच आपल्या मोठ्या
भावाच्या आदर्शांचे पालन करतो. हे कथेतील एक भावनिक आणि मजबूत पात्र आहे.

काय म्हणाला आदिनाथ कोठारे?

रामायण चित्रपटाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणाला की, 'रामायण' हा केवळ एक चित्रपट नसून, ती भारतातील सर्वात मोठ्या कथांपैकी एक आहे आणि त्याचा भाग असणे हे त्याच्यासाठी एक मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे मला मिळालेल्या संधीचे सोने करणार आहे.

आयुष्यातील सर्वोत्तम पटकथा - आदिनाथ

बॉलीवूड हंगामाला नुकतीच आदिनाथ कोठारेने मुलाखत दिली. यामध्ये त्याने सांगितले की, मुकेश छाब्रा यांनी त्याला ही भूमिका मिळवून दिली आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. आदिनाथ कोठारे यावेळी मुकेश छाब्रा, नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा यांचे आभार मानायला विसरला नाही. आपल्या आयुष्यातील ही सर्वोत्तम पटकथा असल्याचेही आदिनाथ कोठारेने म्हटले आहे.

खूप काही शिकायला मिळणार

आदिनाथ कोठारे आपल्या मुलाखतीत पुढे म्हणाला की, 'रामायण' सारख्या चित्रपटाची तयारी आणि काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. या चित्रपटातून केवळ अभिनय करण्याची संधीच नाही, तर एक अभिनेता आणि एक व्यक्ती म्हणूनही खूप काही शिकायला मिळत आहे. कोणताही चित्रपट शाळा इतका मोठा चित्रपट कसा बनवला जातो हे शिकवू शकत नाही असे तो म्हणाला.

'रामायण' चित्रपटाबद्दल

'रामायण'मध्ये टीव्ही, बॉलिवूड, दक्षिण आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश आहे, कारण निर्माते सर्वोत्तम प्रतिभांना संधी देऊ इच्छितात. मिडिया रिपोर्टवर विश्वास ठेवल्यास, दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी २०१६ पासूनच या चित्रपटावर काम सुरू केले आहे. या भूमिकेमुळे आदिनाथ कोठारेच्या कारकिर्दीतील ही एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+