ठरलं! रणबीर-साई पल्लवीच्या 'रामायण'ची अपडेट आली; कधी दिसणार फर्स्ट लूक? कधी होणार प्रदर्शित? वाचा
रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'रामायण' या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे कथानक, स्टारकास्ट आणि शुटींग याबाबत नेहमी कोणत्या ना कोणत्या बातम्या येत असतात. नितेश तिवारी दिग्दर्शित बीग बजेट असलेल्या 'रामायण'ची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरलेले आहेत. आता याच चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

कसा आहे चित्रपट?
रणबीर-सई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. हा एक मेगा बजेट चित्रपट आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या व्यक्तिरेखांची झलक पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. चित्रपटाचे चित्रीकरणही अनेक दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. या चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांना कधी पाहता येईल हे निर्मात्यांनी सांगितले आहे.
कधी दिसेल पहिली झलक?
रणबीर-साईच्या 'रामायण' चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले, की या चित्रपटाची झलक २०२५ च्या वेव्हज समिटमध्ये दाखवली जाईल. निर्मात्यांच्या या अपडेटमुळे सर्व चाहते खूप उत्साहित झाले आहेत. हा चित्रपट दोन भागात बनवला जात आहे. या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ ला आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ ला प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाबद्दल सर्वजण खूप उत्सुक आहेत.
काय आहे वेव्हज समिट?
वेव्हज समिट २०२५ हे शिखर परिषद मुंबईत आयोजित केले जाते. जगभरातील मनोरंजन, सामग्री आणि निर्मितीशी संबंधित अनेक दिग्गज या समिटमध्ये सहभागी होत असतात. यावेळी या समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. हे समिट १ मे ते ४ मे दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत, रवी दुबे लक्ष्मणच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत.












Click it and Unblock the Notifications