ड्रामा क्वीन राखी सावंत चित्रपटांशिवायही करते मोठी कमाई, जाणून घ्या तिची एकूण संपत्ती
Rakhi Sawant Net Worth: नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव आणि चर्चेत राहणारी बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत लवकरच तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. ती गेल्या काही काळापासून ती भारत सोडून दुबईमध्ये राहत आहे. आदिल खान दुर्राणीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आता तिचे नाव पाकिस्तानच्या दोदी खानशी जोडले जात आहे. राखी सावंत लवकरच तिसरे लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान राखीने खुलासा केला की दोदी खानने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. पण अद्याप तिने लग्नाबाबत अधिकृत खुलासा केला नाही. अशा परिस्थितीत राखी दुबईला काय करते. तिच्या कमाईचे सोर्स काय. तिच्याकडे एकूण संपत्ती किती आहे, याची उत्सूकता निर्माण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया राखीच्या संपत्तीबद्दल.

राखी सावंत बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे, पण तरीही ती खूप कमाई करत असल्याचं एका रिपोर्ट्सनुसार समोर आलं आहे. या अभिनेत्रीची एकूण संपत्ती 41.65 कोटी रुपये आहे. राखी महिन्याला सुमारे 50 लाख रुपये कमवते. एवढेच नाही तर ती इंस्टाग्राम जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करते.
राखी सावंतला बिग बॉस 14 मध्ये एका आठवड्यासाठी 1.5 लाख रुपये मिळत होते. या व्यतिरिक्त राखीला महागड्या गाड्यांचाही शौक आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ GLE 350d, BMW X5 यांचा समावेश आहे. ज्याची किंमत कोटींमध्ये आहे.
एक काळ असा होता जेव्हा राखी सावंत बॉलिवूडमध्ये एकामागून एक चित्रपट करत होती. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक आयटम साँग केले. आता चित्रपटांपासून दूर ती सोशल मीडियावर सक्रिय राहते. या अभिनेत्रीचे मुंबई आणि दुबईमध्ये आलिशान घरे आहेत. दरम्यान तिच्या घराच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती नाही.
राखी सावंतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिचे लग्न आदिल खान दुर्राणीशी झाले होते. पण हे नातं एक महिनाही टिकलं नाही. राखीने आदिलवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर आदिलला तुरुंगात जावे लागले. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांच्यात घटस्फोट झाला. तुरुंगातून बाहेर आल्यापासून राखी दुबईत आहे. दोदी खानशी लग्न केल्यानंतर राखी पाकिस्तानात स्थलांतरित होईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल?












Click it and Unblock the Notifications