Jailer 2 Announcement: जबरदस्त अॅक्शनसाठी सज्ज झालेत रजनीकांत; 'जेलर 2' ची घोषणा, टीझर रिलीज
Jailer 2 Announcement : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत पुन्हा एकदा जबरदस्त अॅक्शनसाठी सज्ज झालेले आहेत. त्यांच्या सुपरहिट चित्रपट 'जेलर' चा सिक्वेल 'जेलर-2' ची घोषणा करण्यात आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये रजनीकांत यांची जबदरस्त झलक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा टीझर सन टीव्हीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
टीझरची सुरुवात 'जेलर -2' चे दिग्दर्शक नेल्सन आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध यांनी केली आहे. जे एका नवीन पटकथेवर चर्चा करताना दिसतात. दरम्यान, त्यांना काही लोक घेरतात ज्यांना एकामागून एक गोळ्या लागतात आणि ते जखमी अवस्थेत पळून जातात. यानंतर, रजनीकांत आत येतो आणि गुंडांना मारण्यासाठी त्यांच्या मागे जातो.

'जेलर-2' मध्ये रजनीकांतचा दमदार लूक दिसला
'जेलर २' च्या टीझरमध्ये रजनीकांत रक्ताने माखलेला पांढरा शर्ट परिधान केलेला दिसतोय. त्याच्या एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात तलवार आहे. डोळ्यात राग आणून तो नेल्सन आणि अनिरुद्धला गुंडांबद्दल विचारतो, जे त्याला पत्ता देतात. यानंतर, रजनीकांत नेल्सन आणि अनिरुद्ध ज्या घरात आहेत त्या घरात बॉम्बस्फोट करतो. यानंतर सुपरस्टारला अडथळे आणि गोळ्यांचा सामना करताना पाहिले जाऊ शकते.
जेलर हा रजनीकांत यांचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट
'जेलर 2' हा रजनीकांत यांच्या 2023 मध्ये आलेल्या 'जेलर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. चित्रपटातील रजनीकांतचा अद्भुत अवतार लोकांना खूप आवडला आणि तो सुपरस्टारच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. जेलर हा तमिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. आता निर्मात्यांना 'जेलर 2' कडून खूप आशा आहेत, सध्या चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका! -
वयाच्या 30व्या वर्षीच विसरभोळेपणा वाढलाय? सावधान 'ब्रेन' हा आजार असू शकते, जाणून घ्या लक्षणे








Click it and Unblock the Notifications