Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'शेवटी सत्य समोर येतंच...' पंतप्रधान मोदींनी केलंय 'द साबरमती रिपोर्ट'चं कौतूक

विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट' या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत सव्वा तीन कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट जास्त चर्चेत आलाय तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कौतुकामुळे. मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाबाबत एक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, सत्य सर्वांसमोर येतंच आणि शेवटी वस्तुस्थितीही समजते.

The Sabarmati Report

काय केलीय पंतप्रधान मोदींनी पोस्ट?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक पोस्ट केली. ही पोस्ट आलोक भट्ट नावाच्या वापरकर्त्याची होती ती पुन्हा पोस्ट केली. गोध्रा घटनेवर आधारित 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचा ट्रेलरही या पोस्टमध्ये वापरण्यात आला आहे. रिपोस्ट करताना पीएम मोदींनी लिहिलं आहे की, 'सत्य समोर येतंय ही चांगली गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने समोर येत आहे ज्याला सामान्य लोकसुद्धा बघू शकतात. एक बनावट कथा काही काळच टिकते. आपण शेवटी सत्य समोर येतंच!'

कशावर आधारीत आहे हा चित्रपट?

विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट २७ फेब्रुवारी २००२ रोजी घडलेल्या गोध्रा आगीच्या घटनेवर आधारित आहे. त्यानंतर गुजरातमधील गोध्रा येथे अयोध्येहून परतणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या कारसेवकांच्या बोगीला आग लागली होती. या हृदयद्रावक घटनेत 59 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

चित्रपटाला किती खर्च आलाय?

विक्रांत मेस्सी, राशी खन्ना, रिद्धी डोग्रा यांच्या या चित्रपटात प्रमुख भुमिका आहेत. या चित्रपटाला तयार करण्यासाठी 50 कोटी रुपये खर्च आल्याचं सांगण्यात येतं. या चित्रपटाने आत्तापर्यंत सव्वा तीन कोटींचा व्यवसाय केला आहे. गोध्रा येथे कारसेवकांनी भरलेली ट्रेन जाळण्यात आली होती. हेच कथानक या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. या घटनेचे पडसाद अजूनही अनेकांच्या मनावर कोरलेले आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+