'या' अभिनेत्रीचे घरभाडे थकले, पोलिस घरी आले कुलूप उघडताच दिसला तिचा मृतदेह! ऐन 32 व्या वर्षी मृत्यू!
Pakistani actress Humaira Azhar Ali passed away : पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा अझगर अली हिचा मृत्यू झाला असून ही बत्तीस वर्षीय अभिनेत्री घरात मृतावस्थेत आढळली. जवळपास दोन आठवड्यापासून ती मृत घरातच पडून होती अशी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानातील ही लोकप्रिय अभिनेत्री असून भारतीय सुप्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाॅबीसारखीच तिचा मृतदेहही घरात कुजलेल्या अवस्थेत होता.
३२ वर्षीय हुमैरा असगर अली ही पाकिस्तानी वाहिनी एआरवायच्या 'तमाशा घर' या रिअॅलिटी शोमध्ये आणि २०१५ मध्ये 'जलाईबी' नावाच्या चित्रपटात दिसली होती. तिच्या मृत्यूनंतर आता पोलिस चौकशी करत असून तिचा मृत्यू कशाने झाला, घरात कुणी आले होते का याचाही पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, घराचे दरवाजे, खिडक्या साबूत असून ग्रीलही तुटलेले नाही. पोस्टमॉर्टम तपासणीनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

घरभाडे थकले अन् पोलिस आले
मोठी ट्रॅजिडी म्हणजे पाकिस्तानच्या कराचीमध्ये हुमैरा भाड्याने घर घेऊन ती घरात एकटीच राहत होती. तिचे घरभाडे थकले होते. हुमैराने २०२४ पासून भाडे दिले नसल्याचा आरोप तिच्या घरमालकाचा होता, त्यामुळे स्थानिक न्यायालयाने ती राहत असलेले घर खाली करण्याचे आदेश दिले होते, यामुळे ८ जुलै रोजी मंगळवारी पोलिसांनी अभिनेत्री आणि रिअॅलिटी टीव्ही व्यक्तिमत्व हुमैरा असगर अली (३२) हिचे अपार्टमेंटमधील घर गाठले. तिथे कुलूप तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला, परंतु त्यांना हुमैराचा कुजलेला मृतदेह आढळला. हिंदुस्थान टाईम्सनुसार, ती इत्तेहाद कमर्शियल नावाच्या ठिकाणी असलेल्या अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती.
दोन आठवड्यापासून घरातच मृतदेह?
मिडिया रिपोर्टनुसार, हुमैराचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या स्थितीत होता.एका अंदाजानुसार किमान दोन आठवडे तिच्या मृत्यूला झाले असावेत. सुरुवातीच्या निष्कर्षांमध्ये संभाव्य नैसर्गिक कारणे समोर येत आहेत.
कोण होती हुमैरा असगर?
- हुमैरा असगर ही एक पाकिस्तानी अभिनेत्री, मॉडेल आणि थिएटर कलाकार होती. तिचा जन्म १० ऑक्टोबर १९९२ रोजी लाहोर, पाकिस्तान येथे झाला.
- एआरवाय डिजिटलच्या "तमाशा घर" या रिअॅलिटी शोमध्ये तिच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली आणि तिने मोठी मिळवली.
- "लाली", "बेनाम", "चल दिल मेरे" आणि "सैराट-ए-मुस्तकीम" सारख्या टीव्ही मालिकांमध्ये तिने उल्लेखनीय भूमिका केल्या.
- हुमैराच्या चित्रपट कारकिर्दीत "जलाईबी" (२०१५) आणि "लव्ह वॅक्सिन" (२०२१) सारखे चित्रपट समाविष्ट होते. जे खूप प्रसिद्ध झाले होते.
कसे होते करिअर
- टीव्ही शो अन् मालिका : ११० हून अधिक मालिका अन शो, अजोका आणि रफी पीर ग्रुप सारख्या प्रमुख गटांसोबत काम
- टीव्ही आणि चित्रपट: "तमाशा घर", "जलाईबी" आणि "लव्ह वॅक्सिन" यासह विविध नाटके आणि चित्रपटांमध्ये काम.
- मॉडेलिंग: वीत मिस सुपर मॉडेल २०१४ स्पर्धेत भाग घेतला, जिथे ती टॉप ३ फायनलिस्टमध्ये होती












Click it and Unblock the Notifications