Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नोरा फतेहीच्या स्लिम फिगरचे रहस्य काय?, जाणून घ्या अभिनेत्रीने सांगितलेली फिटनेसची गुरूकिल्ली?

Nora Fatehi Diet and Fitness Secrets : बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि मोहक अभिनेत्रींपैकी एक म्हणून नोरा फतेहीची ओळख आहे. तिच्या अप्रतिम डान्स मूव्ह्ससोबतच तिची पतली कंबर आणि आकर्षक फिगर नेहमीच चर्चेत असते. अनेक मुलींना नोरासारखी फिगर हवी असते आणि त्यासाठी त्या खूप मेहनत घेतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नोराने तिच्या फिटनेस आणि आहाराचे रहस्य उघड केले आहे.

Nora Fatehi Diet and Fitness Secrets

संतुलित आहार हाच फिटनेसचा पाया

नोराने सांगितले की, तिला खाण्याची खूप आवड आहे, पण ती नेहमी संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करते. तिच्या दिवसभरातील खाण्याचे वेळापत्रक पाहता, तिच्या डाएटमध्ये विविधता असल्याचे दिसते.

सकाळचा नाश्ता (Breakfast)

नोरा दिवसाची सुरुवात फ्रेंच टोस्ट, ताजी फळे आणि ब्लॅक कॉफीने करते.

दुपारचे जेवण (Lunch)

दुपारच्या जेवणात ती विविध प्रकारच्या हिरव्या भाज्या आणि चिकन खाते. याव्यतिरिक्त, ती पास्ता आणि चिकन स्ट्यू किंवा चिकन सूप देखील पसंत करते.

रात्रीचे जेवण (Dinner)

रात्रीच्या जेवणात ती सॉससह मॅश बटाटा खाते. कधीकधी तिला भूक लागल्यास ती मसूर, भात किंवा पोळी खाते.

नोराच्या मते, तिच्यासाठी 'चीट डे' (cheat day) असा नसतो, कारण ती रोज आपल्या आवडीचे पदार्थ खाते. फक्त ती गोड पदार्थ खाणे टाळते आणि दिवसभर भरपूर पाणी पिते, ज्यामुळे तिची त्वचा आणि केस निरोगी राहतात.

आवडते फळ आणि टाळलेले पदार्थ!

नोराला फळे खूप आवडतात. आंबा हे तिचे सर्वात आवडते फळ आहे. जेव्हा आंब्याचा सिझन नसतो, तेव्हा ती पीच आणि स्ट्रॉबेरी खाते. तिला सीफूड (समुद्री पदार्थ) अजिबात आवडत नाही, त्यामुळे ती मासे खाण्याऐवजी चिकनला प्राधान्य देते.

व्यायाम आणि झोपेचे महत्त्व!

नोरा तिच्या फिटनेससाठी खूप समर्पित आहे. ती दररोज सुमारे दोन तास जिममध्ये घालवते. तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये विविध प्रकारचे व्यायाम समाविष्ट आहेत:

संपूर्ण शरीरासाठी ताकद प्रशिक्षण (full body strength training)

  • कोर स्ट्रेंथ व्यायाम
  • लेग स्ट्रेच आणि स्क्वॅट्स
  • बेली डान्स आणि पोल डान्स
  • पायलेट्स ट्रेनिंग

फिटनेसचे रहस्याबाबत सांगितले तीने पॉईंट्स

नोराच्या मते, फिटनेस केवळ शरीराचा आकार राखण्यासाठीच नाही, तर ऊर्जा आणि तग धरून ठेवण्यासाठीही आवश्यक आहे. त्याचबरोबर, तिला पुरेशी झोप घेणेही महत्त्वाचे वाटते.

बिझी शेड्युलमुळे तिला शूटिंगच्या वेळी 6 तास झोप मिळते, पण सुट्टीच्या दिवशी ती 10 तास झोपून शरीर आणि मन दोन्हीला आराम देते.

थोडक्यात, नोरा फतेहीच्या फिटनेसचे रहस्य म्हणजे संतुलित आहार, नियमित आणि कठोर व्यायाम, आणि पुरेशी झोप यांचा योग्य समतोल. तिच्या फिटनेस प्रवासातून हे स्पष्ट होते की, परिपूर्ण शरीर आणि निरोगी जीवनशैली मिळवण्यासाठी या तीन गोष्टींचा समन्वय साधणे अत्यंत आवश्यक आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+