Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नवनीत राणांना 'गँगरेप' आणि जीवे मारण्याची धमकी; हैदराबाद कनेक्शन! 'हे' आहे धमकीचे मोठे कारण

Navneet rana Net Worth ex mp gets gangrape death threat : भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांना दुसऱ्यांदा गँगरेप आणि जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका स्पीड पोस्टद्वारे पाठवलेल्या पत्रातून ही गंभीर धमकी देण्यात आली असून, त्यात अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला आहे. अमरावती येथील राजापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे राणा यांना ही धमकी मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Navneet rana Net Worth

नवनीत राणांना धमकी नेमकी काय आहे?

नवनीत राणा यांना जीवे मारण्याची आणि त्यांच्या मुलांच्या समोर गँगरेप करण्याची अत्यंत बीभत्स धमकी पत्रातून देण्यात आली आहे. पत्रात पंतप्रधानांचा उल्लेख करून राणा यांच्यासाठी अश्लील शब्द वापरण्यात आले आहेत.

धमकी कोणी दिली, धमकीचे कारण काय?

पोलिस सूत्रांनुसार, हे धमकीचे पत्र हैदराबादमधील जावेद नावाच्या व्यक्तीने पाठवले आहे. नवनीत राणा यांची कट्टर हिंदूवादी भाजपाई म्हणून असलेली प्रतिमा आणि त्यांची कठोर भूमिका, हे या धमकीमागील कारण मानले जात आहे.

नवनीत राणा यांचे खासगी सचिव मंगेश कोकाटे यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी अमरावती गुन्हे शाखेच्या टीमला तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

यापूर्वीही मिळाली होती धमकी

नवनीत राणा यांना अशा प्रकारची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. मे २०२५ मध्ये त्यांना कथितरित्या पाकिस्तानमधून फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानविरोधात एक व्हिडिओ जारी केला होता.

कोण आहेत नवनीत राणा आणि त्यांची संपत्ती?

  • मूळच्या पंजाबच्या असलेल्या नवनीत राणा या तेलुगू सिनेमातील यशस्वी अभिनेत्री होत्या. २०१९ मध्ये त्या अमरावतीतून अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.
  • नवनीत राणा आणि त्यांचे पती (आमदार रवी राणा) यांच्याकडे सुमारे ९ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता आहे.
  • अमरावतीमध्ये ₹१.५६ कोटींची शेतजमीन आणि ₹४६ लाख किंमतीची व्यावसायिक इमारत आहे.
  • मुंबईतील घरं त्यांच्या नावावर मुंबईतील पाटलीपुत्र आशिवारा, गोरेगाव (जवळपास ₹२ कोटी) आणि खार वेस्ट (₹५ कोटींहून अधिक) अशा तीन आलिशान ठिकाणी घरे आहेत.
  • नवनीत राणा दाम्पत्याकडे सुमारे ₹६० लाख किमतीचे सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने आहेत, तसेच त्यांच्याकडे दोन टोयोटा फॉर्च्युनर, एक स्कॉर्पिओ आणि एमजी ग्लॉसर (₹१.२ कोटींहून अधिक) यांसारख्या लक्झरी कार आहेत.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+