Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Naga-Sobhita: लग्नाआधी व्हायरल झाली नागा-शोभिताची लग्नपत्रिका, या दिवशी घेणार सात फेरे

Naga Sobhita Wedding Card: साउथचा सुपर स्टार नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. ऑगस्टमध्ये त्यांनी त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. आता हे कपल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. याबाबतच्या बातम्या मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर आपल्या बघायला मिळत आहेत. या जोडप्याची लग्नाआधीच त्यांची लग्न पत्रिका सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

नागा आणि शोभिताच्या लग्नाचे हे कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघांच्या नावांसोबत दोन्ही कुटुंबातील सदस्यांची नावेही लिहिली आहेत. हे कार्ड व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. लग्नाची तारीख 4 डिसेंबर 2024 रोजी आहे, असं या लग्नपत्रिकेत लिहीलं आहे.

naga chaitanya and sobhita dhulipala

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका पारंपारिक दक्षिण भारतीय पध्दतीने डिझाइन केली आहे. या पत्रिकेच्या तळाशी मंदिराची घंटा आणि दिवे आहेत. जे नवीन सुरुवात आणि आशीर्वादाचे प्रतीक मानलं जाते. लग्नपत्रिकेत लिहिले आहे की, "शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य विवाहबद्ध होणार आहेत. हे कळवण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या विशेष प्रसंगी आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांचा सन्मान करतो."

या वर्षी ऑक्टोबरमध्ये नागा चैतन्यने त्याची होणारी पत्नी शोभितासोबत पहिली पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये दोघांनी सारखेच काळे कपडे घातलेले दिसत आहेत. नागाने ब्लॅक लेदर जॅकेट आणि ग्रे टी-शर्ट घातला होता, तर शोभिताने ब्लॅक टॉप आणि जीन्स घातली होती. हा सेल्फी लिफ्टमध्ये घेण्यात आलेला आहे.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला 8 ऑगस्ट रोजी यांची एंगेजमेंट झाली होती. हे जोडपे सुमारे दीड वर्षे पासून एकमेकांना डेट करत आहे. नागार्जुनने त्याच्या ट्विटर (एक्स) अकाऊंटवर या आनंदाची घोषणा केली होती. त्यांनी लिहिले होते की, "आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, आमचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांची आज सकाळी 9:42 वाजता एंगेजमेंट झाली. आम्ही शोभिताचे आमच्या कुटुंबात स्वागत करतो. या आनंदी जोडप्याला खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम", असं ट्टिट करण्यात आलं होतं.

दरम्यान ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी नागाला त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी खूप ट्रोल करत आहेत. काही चाहत्यांनी समंथा रुथ प्रभूची फसवणूक केल्याचा आरोपही केला. नागा चैतन्यने 2017 मध्ये सामंथा रुथ प्रभूसोबत लग्न केले होते. पण 2021 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला आहे. मात्र या दोघांनीही त्यांचे नाते का तुटले याबाबत कोणतेही विधानस केलेले नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+