शक्तीमान 90 च्या दशकातील टॉप शो! अचानक बंद करण्यामागचे मुकेश खन्नांनी सांगितले कुणाचे होते षडयंत्र?
Mukesh Khanna : 90 च्या दशकात, मुलांचा सर्वात आवडता कार्यक्रम शक्तीमान फक्त दूरदर्शनवर प्रसारित केला जात होता. दर रविवारी सगळी मुलं टीव्ही लावून बसायची. हा केवळ मुलांसाठी शो नाही तर त्यांच्या बालपणीच्या गोड आठवणींचा एक भाग होता. पण एक वेळ अशी आली की हा शो अचानक बंद झाला.
शक्तीमान बनून मुकेश खन्ना यांनी चाहत्यांची मनं जिंकली होती. यामुळेच तो सर्वाधिक लोकप्रिय शो ठरला. पण बऱ्याच दिवसांनी हा शो अचानक बंद झाला. हे पाहून चाहते नाराजही झाले. सर्वाधिक टीआरपी मिळवणारा हा शो अचानक का बंद झाला हे लोकांना समजू शकले नाही.

मुकेश खन्नांचा खुलासा
आता खुद्द मुकेश खन्ना यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर याचा खुलासा केला आहे. शो ला मिळत असलेल्या टीआरपीमुळे दूरदर्शनचे मालक वारंवार शोच्या वेळेत बदल करत असल्याचे अभिनेत्याने सांगितले होते. याशिवाय दूरदर्शनच्या मालकाने नंतर भाड्यात भरघोस वाढ केली होती ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत होते. मुकेश खन्ना म्हणाले, 'मी हा शो खास मुलांसाठी तयार केला होता आणि मुलांनी तो पाहावा हा एकमेव उद्देश होता.
दुपारी शो ठेवण्याचे हे होते कारण
मुले शनिवारी शाळेत असतात आणि शाळेच्या आठवड्यात ते लवकर झोपतात. अशा परिस्थितीत मला वाटले की रविवारी दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम प्रसारित करावा, कारण त्यावेळी मुले घरी असतात आणि आरामात शो पाहू शकतात. पूर्वी माझा शो एकाच वेळी प्रसारित व्हायचा, परंतु शोची लोकप्रियता वाढल्याने दूरदर्शनच्या मालकाने स्लॉटचे भाडे वाढवले आणि 7 लाख रुपयांची मागणी केली.
जास्तीची पैसे देणे शक्य नव्हते
मुकेश खन्ना म्हणाले, 'पूर्वी ही रक्कम 3 लाख रुपये होती, परंतु लोकप्रियतेमुळे दूरदर्शनचे मालक पुन्हा पुन्हा ती रक्कम वाढवत होते कालांतराने त्यांनी 10 लाख रुपयांची मागणी केली, जे माझ्यासाठी शक्य नव्हते, त्यामुळे मला शो थांबवावा लागला. मुकेश खन्ना यांनी असेही सांगितले होते की, हा शो सुरू करण्यासाठी त्यांनी अनेक लोकांकडून कर्ज घेऊन हा शो सुरू केला होता.
19 वर्षांनी शक्तीमानचा टीझर रिलीज
शक्तीमानची सुरुवात 1997 मध्ये झाली होती आणि आता 19 वर्षांनी शक्तीमानचा टीझर रिलीज झाला आहे. मात्र, यावेळी शक्तीमानची भूमिका कोण साकारणार हे मुकेश खन्ना यांनी जाहीर केलेले नाही.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता! -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?








Click it and Unblock the Notifications