Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maalik Movie : राजकुमार रावच्या 'मालिक' चित्रपटाची स्टोरी काय? कसा आहे सिनेमा, जाणून घ्या स्टारकास्ट

Maalik Movie Review : राजकुमार राव हा हुरहुन्नरी अभिनेत्याचे चित्रपट म्हणजे रसिकांसाठी मेजवानीच असतात. राजकुमार राव आताच प्रदर्शित झालेल्या त्याच्या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. एकीकडे राजकुमार रावने त्याची पत्नी पत्रलेखा प्रेग्नंट असल्याची खबर दिली असून यामुळेही तो चर्चेत आहे.

राजकुमार रावचा मालिक हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कसा आहे असे लोक विचारत आहे तर दुसरीकडे रसिकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर ते या चित्रपटाचे विश्लेषण करत आहेत. मानुषी छिल्लर हि या चित्रपटात राजकुमार रावसोबत आहे. मानुषीला अजून थोडे फुटेज द्यायला हवे होते असे रसिकजन म्हणत आहे.

Maalik Movie Review

एका युजर्सने हा चित्रपट चांगला असून राजकुमार रावने चांगलाच भाव या चित्रपटात खाल्ल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या युजर्सने म्हटले की, मध्यातंराआधीचा चित्रपट अपेक्षाभंग असे म्हणत मध्यातंरानंतरचा चित्रपट चांगला असेल असे म्हणत अभिनेत्यांचे प्रदर्शन चांगले होते असे म्हटले आहे.

मालिकमध्ये अजून कोण कोण आहे?

अॅक्शन थ्रिलर असलेल्या मालिक चित्रपटात राजकुमार राव, मानुषी छिल्लरसोबत प्रसेनजित चटर्जी, सौरभ शु्क्ला, हुमा कुरैशी, अंशमान पुश्कर,स्वानंद किरकिरे महत्वपुर्ण भुमिकेत आहेत.

काय आहे मलिक चित्रपटाची स्टोरी

बॉलीवूडमधील नवीनतम गँगस्टर ड्रामा असलेला मालक या चित्रपटाचे कथानक एका शेतकऱ्याच्या मुलाभोवती फिरते. एक घटना म्हणून चित्रपटात दाखवलेले कथानक असून १९९० च्या दशकातील अलाहाबादमध्ये घडलेल्या खऱ्या घटनेवर हा चित्रपट असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटात दीपक नावाच्या एका शेतकऱ्याच्या मुलाची भूमिका राजकुमार रावने केली आहे. दीपक त्याच्या वडिलांच्या सामान्य वारशापेक्षा मोठे जीवन जगण्याचे स्वप्न पाहतो. दीपकचे मालकमध्ये होणारे ज्वलंत रूपांतर, एक भयानक आणि आदरणीय माफिया नेता, हे कथेचे केंद्रबिंदू आहे.

राजकुमार रावच्या पात्राची एक अशीही बाजू

एकीकडे गरीब ते श्रीमंत होण्याची महत्वकांक्षा अभिनेत्याची असते त्याची सफरच या चित्रपटात आहे. राजकुमार रावची आकर्षक पडद्यावरील अभिनय असा आहे की, त्याने रंगवलेले पात्र कधीही एकतर्फी खलनायक वाटत नाही असे आहे. मालक हा फक्त गुन्हेगार आहे असे नाही तर तो त्याच्या सहकाऱ्यांशी फार दयाळू आहे, त्याच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांशी अत्यंत निष्ठावान आहे, परंतु त्याचा विश्वासघात करणाऱ्या किंवा विरोध करणाऱ्यांना तो दया दाखवत नाही. तो धमक्या देण्यास किंवा मारण्यास मागेपुढे पाहत नाही, ज्यामुळे लोक त्याचे भयभीत होतात आणि त्याचे कौतुक करतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+