चित्रपटविश्वातील अजरामर तारा!सर्वांचा लाडका 'लक्ष्यामामा'; वाचा- त्यांच्याविषयी सविस्तर !
Laxmikant Berde biography : मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतीली अजरामर तारा म्हणजेच लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे ऊर्फ लक्ष्यामामा. हे नाव जरी ऐकलं तरी आपसूक मनात एक खंत वाटते ती म्हणजे लक्ष्यामामा आपल्यात का राहिले नाही?,लक्ष्मीकांत बेर्डे हे महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातलं असं एक ताईत आहे; जे पिढ्यान पिढ्या टिकून असेल. दुःख मनात ठेवून प्रेक्षकांना खळखळून हसवत ठेवण्याचा वसाच त्यांनी घेतलेला होता.
चला तर जाणून घेऊया त्यांच्या संपूर्ण जीवनाविषयी, त्यांच्या चित्रपटांविषयी अन् त्यांच्या पश्चात असलेल्या कुटुंबाविषयी. त्यांनी या जगाचा निरोप घेऊन जवळपास 20 वर्षे होत आली आहेत. तरीही ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य कायम ठेवून आहेत, त्याविषयी वाचा सविस्तर..!
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मराठी रंगभूमीवरील प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. 'लक्ष्या ते वेताळे गुरुजी'पर्यंतचा त्यांचा अतिशय खडतर राहिलेला आहे. सिनेसृष्टीत येण्यासाठी त्यांना खूप मेहनत व संघर्ष करावा लागला. पण, त्यांनी सिनेसृष्टीत ठेवलेलं पाऊल आणि त्यांची कामगिरी चिरकाल स्मरणात राहणारी आहे. 'मी आलो... मी पाहिलं... मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं' या गाण्याच्या ओळीप्रमाणेच त्यांचा जीवनप्रवास खऱ्या अर्थाने राहिलेला आहे.

लहानपणापासूनच रंगभूमीचे होते आकर्षण
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 साली मुंबईत झाला. गिरगावातील कुंभारवाड्यात त्यांचं संपूर्ण बालपण गेलं. युनियन हायस्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतलं होतं; तर उच्च शिक्षण चर्नी रोड येथील भवन्स कॉलजेमध्ये झालं होतं. एकांकिका, नाटकाचं वेड हे त्यांना कॉलेजमध्ये असल्यापासून होतं. ते अभिनयात खूप रमायचे. भाऊ बेर्डे ही बेर्डे बंधूंची एक संस्था होती, त्या संस्थेमार्फत ते कोकणात एकांकिका, नाटक करायचे. नाट्य क्षेत्रात त्यांना महत्त्वाचं वळणं मिळाले ते म्हणजे 'टुरटुर' नाटकामुळे. त्यांचा चुलतभाऊ म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'टुरटुर' नाटकामुळे लक्ष्मीकांत बेर्डेंना खरी ओळख मिळाली. यापूर्वी त्यांनी बरीच संगीत नाटकं, बालनाटकं केली, तमाशा केला. पण, त्यांना म्हणावं तसं यश मिळतं नव्हतं; जे 'टुरटुर' नाटकामुळे मिळालं. सुरुवातीला या नाटकाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, पुरुषोत्तम बेर्डेंनी केलेल्या जाहिरातींमुळे या नाटकाकडे प्रेक्षक वळले.
मराठी चित्रपटांशिवाय शांतेचा कर्ता चालु आहे, बिघडले स्वर्गाच द्वार यासारखे विनोदी रंगमंच नाटकही यशस्वी ठरले. बर्डेने बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आणि कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेर पुरस्कारासाठी चार नामांकने मिळाली. त्यांनी सुमारे 185 हिंदी आणि मराठी चित्रटांमध्ये काम केले आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मृत्यू कधी झाला?
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मूत्रपिंडाच्या आजारामुळे 16 डिसेंबर 2004 रोजी मुंबईत निधन झाले. महेश कोठारे, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यासारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत व्यक्ती त्यांच्या अंत्यदर्शनाला हजर होते. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत, बेर्डे यांनी स्वतःचे अभिनय बेर्डे यांच्या नावावर 'अभिनय आर्ट्स' हे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस चालवले. बेर्डे एक निपुण वेंट्रोलोक्विस्ट आणि गिटार वादक होते. तर आता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सहाहून अधिक शहरांत एकांकिका स्पर्धा होतात.

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या करिअरची सुरूवात कशी झाली?
मराठी साहित्य संघात कर्मचारी म्हणून काम करत असताना बेर्डे यांनी मराठी रंगमंच नाटकांतून छोट्या छोट्या भूमिकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 1984 च्या मराठी चित्रपटाने 'चल चालली सासारला' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले.त्यानंतर ते अभिनेता महेश कोठारे यांनी धूम धडाका आणि दे दणादण चित्रपटात एकत्र काम केले. हे दोन्ही चित्रपट प्रसिद्ध झाले आणि बर्डेला आपली ट्रेडमार्क विनोदी शैली प्रस्थापित करण्यास मदत केली.
बहुतेक सिनेमांमध्ये त्यांनी महेश कोठारे व अशोक सराफ उर्फ अशोक मामा यांच्यासोबत काम केले. बेर्डे-सराफ यांची जोडी भारतीय सिनेमात जोडीदार यशस्वी अभिनेता म्हणून ओळखली जाते.अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्यासह बेर्डे यांनी 'अशी ही बनवा बनवी' या मराठी चित्रपटात एकत्र काम केल्यामुळे मराठी चित्रपटांचे रुपडंच पालटलं.
ते दशक मराठी चित्रपटसृष्टीत 'अशोक-लक्ष' युगाच्या रूपात सर्वांना चांगलेच कायम स्मरणात राहणार आहे. त्याचबरोबर सलमान खान अभिनीत सूरज बड़जात्याचा मैने प्यार किया हा बेर्डेचा पहिला हिंदी चित्रपट होता. त्यांच्या इतर काही लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये हम आपके हैं कौन ..! या चित्रपटामध्ये देखील त्यांनी सहकलाकार म्हणून भूमिका साकारली.

लक्ष्मीकांत बर्डे यांची काही मराठी चित्रपट!
१९८५ - लेक चालली सासरला, १९८५- धूमधडाका, १९८६- गडबड घोटाळा , १९८६- तुझ्यावाचून करमेना, १९८६-धाकटी सून, १९८७-प्रेम करू या खुल्लम खुल्ला, १९८७-भटक भवानी, १९८७ - कळतंय पण वळत नाही, १९८७-प्रेमासाठी वाट्टेल ते, १९८७-खरं कधी बोलुन नहे, १९८७- दे दणादण, पोरींची धमाल बापाची कमाल, १९८७ चल लक्ष्या मुंबईला, १९८७-गौरवाचा नवरा, १९८८-अशी ही बनवाबनवी, १९८८ मामला पोरींचा, किस बाई किस, १९८८ घोळात घोळ, १९८८ मज्यांच मज्या, १९८८- अशी ही बनवा बनवी, १९८८ रंगात संगत, 1989- आंटीने वाजवली घंटी,१९८९- थरथराट, हमाल दे धमाल, १९८९ - बाळाचे बाप ब्रह्मचारी,१९८९-भुताचा भाऊ, १९९०-लपवाछपवी, १९९० शुभ बोल नाऱ्या, 1990- धडाकेबाज, १९९०-कुठं कुठं शोधु मी तुला, १९९०- धमाल बाबल्या गणप्याची, १९९१ शेम टू शेम, १९९१ आयत्या घरात घरोबा, १९९१ मुंबई ते मॉरिशस, १९९१ येडा की खुळा, १९९२ एक होता विदूषक, १९९२ जिवलागा, १९९३ - झपाटलेला, २००४ - खतरनाक, १९९४ - चिकट नवरा, १९९४ बजरंगाची कमाल, १९९५- जमलं हो जमंलय,२००३ नवरा मुंबईचा, २००० सत्त्वपरिक्षा, २००० खतरनाक, २००१ देखनी बायको नाम्याची, २००२मराठा बटालियन , २००२ - दागिना, २००३-आधारस्तंभ , २००४ - पछाडलेला ही त्यांची नावाजलेली चित्रपट होती.

लक्ष्यामामाची नावाजलेली नाटकं
लक्ष्मीकांत बेर्डे यांची चित्रपटसृष्टीत पर्दापणापूर्वी त्यांची ओळख निर्माण झाली ती नाटकांमुळे. त्यांची अजरामर नाटकांमध्ये टुरटुर, बिघडले स्वर्गाचे दार आणि शांतेचं कार्टं चालू आहे ही नाटकं खूप नावाजली होती. त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तर त्यांची ओळख देखील त्यातून निर्माण झाली.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे कुटुंब?
अभिनेत्री प्रिया बेर्डेंसोबत लक्ष्मीकांत यांनी दुसऱ्यांदा संसार थाटला. या जोडीनं अनेक मराठी चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तसंच हिंदी चित्रपटातसुद्धा हे दोघे एकत्र झळकले होते. अभिनय आणि स्वानंदी ही प्रिया-लक्ष्मीकांत यांची दोन मुलं. या दोघांनीही आता सिनेसृष्टीत पदार्पण केलंय.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पहिलं लग्न?
लक्ष्मीकांत यांचे चित्रपट जितके चर्चेत असायचे तितकीच चर्चा त्यांच्या खासगी आयुष्याही झाली. त्यांचं पहिले लग्न रुही बेर्डेसोबत झालं होतं. पण काहीच वर्षे दोघांचा संसार टिकला. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रुही यांच्यासोबत कमाल माझ्या बायकोची या चित्रपटांमध्ये काम केलं होते. या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अलका कुबल यांच्या पतीची भूमिका साकारली होती, तर रूही या चित्रपटात दुसऱ्या भूमिकेत होत्या. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रुही यांच्यासोबत लग्न केलं होतं.पण नंतर लक्ष्मीकांत प्रिया यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ते प्रिया यांच्यासोबत लिव्हइनमध्ये राहत होते. यादरम्यान, रुही यांचं कॅन्सरच्या आजारानं निधन झालं. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया यांच्याशी लग्न केलं.












Click it and Unblock the Notifications