Kanguva OTT Release: ओटीटीवर सूर्याचा 'कांगुवा' कधी आणि कुठे रिलीज होणार,जाणून घ्या संपूर्ण माहिती
Kanguva OTT Release: साऊथचा सुपरस्टार सूर्याचा चित्रपट 'कंगुवा' काल 14 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सूर्याचा 'कंगवा' हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसासाठी मोठी आगाऊ बुकिंग झाली होती. निर्मात्यांना आशा आहे की, हा ॲक्शन-पॅक्ड फँटसी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहे.
सूर्याने चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली
या चित्रपटात सूर्यासोबत बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आणि अभिनेत्री दिशा पटानी देखील दिसणार आहेत. सूर्याने या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली आहे. शिवाचा 'कंगुवा' हा चित्रपट प्रसिद्ध तामिळ कादंबरी 'परी'वर आधारित असल्याचं बोललं जात आहे.

चित्रपटाची कथा एका तामिळ कादंबरीवर आधारित
तमिळ कादंबरी परी एका महान योद्ध्याची कथा सांगते ज्याने चोल, चेरा आणि पांड्यांपुढे कधीही हार मानली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार 'कंगुवा' चित्रपटात सूर्या त्याच शूर योद्ध्याची भूमिका साकारत आहे. बॉबी देओल या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत खूपच खतरनाक लूकमध्ये दिसत आहे.
OTT वर 'कांगुवा' कधी आणि कुठे प्रदर्शित होणार
'कांगुवा'ला रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दक्षिणेतील अनेक भागात चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल दिसला. यासोबतच सूर्या आणि बॉबी देओलच्या चित्रपटाची कथा, स्टार कास्ट आणि व्हीएफएक्सचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video ने 'कंगुवा' चे डिजिटल हक्क 100 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. यासोबतच पोंगल म्हणजेच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर 'कांगुवा' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचेही बोललं जात आहे.
दिशा पटानीचं तमिळ इंडस्ट्रीत पदार्पण
'कंगुवा' हा तमिळ चित्रपट असून तो हिंदीतही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली आहे, तर बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सूर्याच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाद्वारे दिशा पटानीने तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. सिरुथाई सिवा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.












Click it and Unblock the Notifications