Jolly llb 3 movie Review in marathi :अक्षय कुमार-अरशद वारसीची 'जॉली एलएलबी ३' कशी आहे? रिव्ह्यू वाचा
Jolly llb 3 movie Review in marathi : मोठा गाजावाजा होत असलेला जाॅली एलएलबी - ३, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सिने रसिक वाट पाहत आहेत. या चित्रपटाची मोठी स्टारकास्ट असून अक्षय कुमार आणि अरशद वारसीसारखे मोठे कलाकार या चित्रपटात आहेत. उद्या १९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा प्रदर्शनापूर्वीच पहिला रिव्ह्यू समोर आला आहे.
'जॉली एलएलबी ३' या चित्रपटात उमैर संधू, यांनी स्वतःला 'ओव्हरसीज सेन्सर बोर्डाचे सदस्य' म्हटले असून त्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. आता रसिकांना या चित्रपटाबद्दल वाट पाहायची गरज नसून उद्या तिकीट बुक करण्यापुर्वी हा रिव्ह्युव्ह वाचायला हरकत नाही.

'जॉली एलएलबी ३'चा रिव्ह्यू
उमैर संधू यांच्या मते, 'जॉली एलएलबी ३' हा एक दमदार आणि जबरदस्त कोर्टरूम ड्रामा आहे. हा चित्रपट सामान्य माणसाच्या न्याय आणि निपक्षपातीपणाच्या लढाईचे उत्तम चित्रण करतो.
चित्रपटाचे मुख्य आकर्षण
चित्रपटातील मुख्य आकर्षण अक्षय कुमार, अरशद वारसी आणि सौरभ शुक्ला यांचा अभिनय आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीवरच संपूर्ण चित्रपट अवलंबून आहे.
कसा आहे चित्रपट?
संधू यांच्या मते, चित्रपटाची कथा आणि पटकथा तुलनेने साधी असून, ती 'सरासरी' (average) आहे. चित्रपटाचे संगीत हे सर्वात कमकुवत बाजू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकंदरीत, हा चित्रपट पैसे वसूल (Paisa Vasool) आहे.
बॉक्स ऑफिस प्रेडिक्शन
ट्रेड एक्स्पर्ट्सच्या मते, 'जॉली एलएलबी ३' पहिल्या दिवशी १३ ते १५ कोटी रुपयांची कमाई करू शकतो, जी एक चांगली ओपनिंग मानली जाते. 'जॉली एलएलबी २' ने पहिल्या दिवशी १३.२० कोटी रुपये कमावले होते, त्यामुळे जर हा चित्रपट १५ कोटींपर्यंत पोहोचला तर तो जुना विक्रम मोडू शकतो. जर चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली, तर शनिवार आणि रविवारच्या कलेक्शनमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केले आहे. यात हुमा कुरेशी, अमृता राव, सौरभ शुक्ला आणि अन्नू कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे कलाकार सध्या त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
हेही वाचा : अवघ्या 1 मिनिटांत डाऊनलोड करा 3 GB मुव्ही! भारतातील दुर्गम भागातही मिळणार हायस्पीड इंटरनेटची सुविधा
हेही वाचा : Baaghi - 4 Review : 'बागी - 4' अॅक्शनचा धमाका! कसा आहे चित्रपट? पाहावा की नाही घ्या जाणून रिव्ह्यू












Click it and Unblock the Notifications