Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Baaghi - 4 Review : 'बागी - 4' अ‍ॅक्शनचा धमाका! कसा आहे चित्रपट? पाहावा की नाही घ्या जाणून रिव्ह्यू

Baaghi - 4 Review How is Tiger Shroff Sanjay Dutt's movie : 'बागी 4' हा चित्रपट आज 5 सप्टेंबर 2025 रोजी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.ट टायगर श्रॉफ, संजय दत्त, हरनाज संधू आणि सोनम बाजवा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Baaghi - 4 Review

'बागी 4' (Baaghi 4) चित्रपटामध्ये रॉनीच्या (टायगर श्रॉफ) आयुष्याची कथा आहे, जो एका भीषण अपघातातून बचावतो. या घटनेनंतर त्याचे जीवन पूर्णपणे बदलून जाते आणि तो त्याच्या प्रेयसीला, अलीशाला गमावल्याच्या दुःखात बुडून जातो.

इथूनच चित्रपटाचा खरा मानसशास्त्रीय खेळ सुरू होतो. रॉनी वेडा झाला आहे की तो काहीतरी मोठा गेम खेळत आहे, हा सस्पेन्स शेवटपर्यंत टिकून राहतो. चित्रपटाची कथा याच प्रश्नाभोवती फिरते, पण अधिक दमदार होऊ शकली असती. अ‍ॅक्शनच्या तुलनेत कथेची मांडणी कमकुवत वाटत असल्याने, चित्रपट अपेक्षित मजा देत नाही. 'बागी' फ्रँचायझीची कथा हीच त्याची सर्वात मोठी उणीव राहिली आहे.

कलाकारांची कामगिरी कशी आहे?

टायगर श्रॉफने या चित्रपटात अ‍ॅक्शनसोबतच भावनिक बाजूही प्रभावीपणे दाखवली आहे. अनेक दृश्यांमध्ये त्याचे दुःख स्पष्ट जाणवते. मात्र, या चित्रपटातील सर्वात मोठे सरप्राईज पॅकेज म्हणजे संजय दत्त. खलनायकाच्या भूमिकेत तो क्रूर, दमदार आणि अविस्मरणीय वाटतो. जेव्हा जेव्हा टायगर आणि संजय दत्त समोरासमोर येतात, तेव्हा चित्रपटामध्ये एक नवीन ऊर्जा येते.

टायगर, सोनम बाजवा, संजय दत्त आणि हरनाझ संधू यांच्यासह श्रेयस तळपदे, उपेंद्र लिमये, सौरभ सचदेवा आणि महेश ठाकूर यांसारख्या चांगल्या कलाकारांची फौज असूनही त्यांना फारसा वाव मिळालेला नाही.

दिग्दर्शन आणि अ‍ॅक्शन

'बागी 4' चे दिग्दर्शन ए. हर्षा यांनी केले आहे. ही त्यांची बॉलीवूडमधील पहिलीच फिल्म असली, तरी त्यातील अ‍ॅक्शन पाहून त्यांचा साऊथशी असलेला संबंध लगेच लक्षात येतो. चित्रपटातील मारामारी गरजेपेक्षा जास्त दाखवली आहे. काही अ‍ॅक्शन सीन्सचा कथेशी काहीही संबंध वाटत नाही. अनेक ठिकाणी हे दृश्य दुसऱ्या चित्रपटातून कॉपी केल्यासारखे वाटतात.

चित्रपटाची कथा साजिद नाडियाडवाला यांनी रजत अरोरा यांच्यासोबत मिळून लिहिली आहे. कथेवर आणखी मेहनत घेण्याची गरज होती.

चित्रपट पाहावा की नाही?

'बागी 4' हा पूर्णपणे मारामारी आणि अ‍ॅक्शनने भरलेला चित्रपट आहे. ज्यांना केवळ अ‍ॅक्शन आवडते, त्यांनीच हा चित्रपट पाहावा. चित्रपटातील हिंसेमुळे कुटुंबासोबत हा चित्रपट पाहणे टाळलेलेच बरे. टायगरचा नवीन अवतार आणि सस्पेन्स जरी असला तरी, हा चित्रपट अ‍ॅक्शनप्रेमींसाठी एक 'ट्रीट' आहे.

रेटिंग: 3 स्टार्स

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+