आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंतशी 'या' 2 सुंदरींशी जोडले गेले नाव! कोण आहेत 'त्या' दोघी? वाचा
Ipl Big expensive player rishabh pant relationship : ऋषभ पंत अलीकडे फारच चर्चेत आहे, या उमद्या क्रिकेटरला यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वात महाग खेळाडू म्हणून गणले गेले आहे. ऋषभची खेळी तसे पाहीले तर खतरनाकच म्हणावी लागेल कारण तो जेव्हा मैदानात असतो तेव्हा बॅटमधून धावांवर धावा निघतात. मैदानासोबतच तो खासगी आयुष्यातही आता चांगलाच चर्चेत आला आहे. त्याला कारणही महत्वाचे आहे. दोन सुंदरींशी त्याचे नाव जोडले गेले आहे. या दोन कोण आहेत हे आपण आज जाणून घेऊ.
भारतीय विकेटकीपर आणि शक्तिशाली फलंदाज ऋषभ पंत यावेळच्या आयपीएल लिलावात पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला 27 कोटींना विकत घेतले आहे. उर्वशी रौतेला आणि इशा नेगी या दोघींशी त्याचे नाव जोडले गेले आहे, यापैकी उर्वशीबद्दल आपण आधी जाणून घेऊया.

उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांचे नाते
ऋषभ पंत त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबतच्या डेटिंगच्या बातम्यांमुळे तो चर्चेत असतो. त्यांच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर येत असतात. उर्वशी रौतेला भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतसोबत डेट करण्याच्या बातम्यांमुळे खूप दिवसांपासून चर्चेत आहे त्याला कारण म्हणजे उर्वशीची पोस्ट, यामुळे अफवांनाही मोठा ऊत आला होता. 2022 मध्ये, या अभिनेत्रीने एका पोस्टद्वारे सांगितले होते की आरपी (ऋषभ पंत) ने तिची अनेक तास प्रतीक्षा केली होती. यानंतर उर्वशीने ऋषभ पंतबद्दल असे का सांगितले यावर लोक कयास लावत होते.
ऋषभ पंत आणि ईशा नेगीचे नाते
वनइंडिया हिंदीनुसार, केवळ उर्वशी रौतेलाच नाही तर ऋषभ पंतचे नावही आणखी एका सौंदर्याशी जोडले गेले आहे. ती म्हणजे इशा नेगी..दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऋषभ पंत आणि ईशा नेगी रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
ईशा नेगी कोण आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, ईशा नेगी व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे. ईशाने डेहराडूनच्या जीसस अँड मेरी स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. याशिवाय तिने नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटीमधून कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आहे. ईशा अनेकवेळा आयपीएलमध्ये ऋषभ पंतचा सामना पाहण्यासाठी गेली आहे.
माझा माणूस, माझा जीवनसाथी, माझा सर्वात चांगला मित्र
आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान ईशा नेगीने ऋषभ पंतसोबतचा तिचा फोटो शेअर केला आणि तिच्या भावनाही व्यक्त केल्या. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले - माझा माणूस, माझा जीवनसाथी, माझा सर्वात चांगला मित्र, माझ्या आयुष्यातील प्रेम ऋषभ पंत. ईशा नेगीच्या या पोस्टनंतरच त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती.
रेस्टाॅरंटमध्ये दिसले होते ऋषभ- उर्वशी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतही बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये दिसला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. मात्र, ऋषभ पंत या नात्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसला नाही.
अपघातानंतर ऋषभ पंतचे जोरदार पुनरागमन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतचा कार अपघात झाला होता. जवळपास 14 महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर त्याने आयपीएल 2024 द्वारे पुनरागमन केले. आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याने २०२४ च्या टी-२० विश्वचषकातही स्थान मिळवले. यानंतर पंत भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications