Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

" गोविंदाने अखेर मौन सोडले; पत्नीसोबतचा वाद, करिअर आणि राजकीय 'षडयंत्रा'वर खळबळजनक खुलासा!

Govinda breaks silence on wife sunita krushna abhishek family conspiracy : बॉलीवूडचा 'नंबर १' अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहूजा यांच्यातील नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला होता. घटस्फोट आणि अफेअरच्या अफवांना उधाण आले असतानाच, गोविंदा यांनी या सर्व प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली आहे. "माझ्या विरोधात एक सुनियोजित षडयंत्र रचले जात असून माझ्या कुटुंबाचाच माझ्याविरुद्ध वापर केला जात आहे," असा खळबळजनक दावा गोविंदा यांनी केला आहे.

Govinda breaks silence on wife sunita

नेमके प्रकरण काय? गोविंदांच्या विधानातील ५ मोठे मुद्दे

१. कुटुंबाचा आणि कृष्णाचा वापर

गोविंदा यांनी भाचा कृष्णा अभिषेकचा उल्लेख करत म्हटले की, "मी कृष्णालाही सांगितले होते की, तुझा वापर करून माझा अपमान केला जात आहे. माझ्या प्रतिमेची काळजी घेणं तुझंही कर्तव्य आहे. सुनीताला मात्र या गोष्टींचा खूप राग येतो. माझ्या कुटुंबाचा वापर करून मला समाजापासून वेगळे करण्याचा हा डाव आहे."

२. पत्नी सुनीताची चिंता आणि नाराजी

सुनीताशी असलेल्या संबंधांवर बोलताना गोविंदा म्हणाले की, "सुनीता खूप साधी आहे, तिला या षडयंत्राचा अंदाज नाही. मी गेल्या काही वर्षांपासून अनेक सिनेमे नाकारले आहेत. त्यामुळे घर कसे चालणार, या चिंतेतून ती माझ्यावर अनेकदा संतापते. मात्र, माझ्या सिनेमांना मुद्दाम बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात नाहीये."

३. शिवसेनेत प्रवेश करताच 'कट' सुरू

नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या गोविंदा यांनी या वादाला राजकीय किनारही दिली आहे. "मी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि अशातच ही षडयंत्रे सुरू झाली आहेत. मला कोणीही कमकुवत समजू नये. माझ्या विरोधात बोलण्यापूर्वी लोकांनी माझ्या भूतकाळातील कामाचा विचार करावा," असा इशारा त्यांनी दिला.

४. लोकप्रियतेचा 'अदृश्य' शत्रू

जेव्हा लोकप्रियता एका मर्यादेच्या पलीकडे जाते, तेव्हा अनेक लोकांना भीती वाटते. हेच माझ्यासोबत घडत आहे. मी एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या बाबतीतही असेच घडताना पाहिले आहे. माझ्या सिनेमांना मुद्दाम डावलले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

५. मुलांसाठी प्रार्थना आणि भावूक आवाहन

गोविंदा यावेळी काहीसे भावूक झाले. "मी फक्त माझ्या मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. कोणत्याही गैरसमजातून कुटुंब तुटू नये, अशी माझी इच्छा आहे. मला मानसिक घुटन होत आहे आणि देवाने ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : गोविंदा अन् डेव्हिड धवनमध्ये का झाले होते भांडण? अनेक वर्षानंतर पत्नी सुनीताने सांगितले सत्य

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+