शिल्पा शेट्टी व राज कुंद्रांच्या अडचणीत वाढ; घर व ऑफीसवर पडल्या ईडीच्या धाडी
Shilpa Shetty's house raided- अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या घरावर आणि ऑफिसवर ईडीने धाड टाकली. जुहू येथील घर आणि ऑफिसवर धाड टाकल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या पतीपत्नींच्या अडचणी वाढल्याचे समोर आले आहे.

पोर्नोग्राफी प्रकरणात कारवाई
ऑफीस आणि घरावर ईडीने टाकलेल्या या धाडी पोर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणात असल्याचे समजते. ईडीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. शिल्पा आणि राज कुंद्रा यांचं घर तसेच ऑफीसची झडती घेतली जात आहे. राज कुंद्रा याला यापूर्वीही म्हणजेच जून २०२१ मध्ये अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता. दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये त्याला जामीन मिळाला होता. आता पुन्हा ईडीने ही कारवाई केल्यानंतर राज कुंद्रा यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
पॉर्न चित्रपटातून कमावली संपत्ती
अश्लील व भारतात बंदी असलेले चित्रपट बनविण्याच्या उद्योगातून राज कुंद्रा यांनी कोट्यवधींची संपत्ती कमावल्याचा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणात राज कुंद्रा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या चित्रपटात प्रचंड पैसा असल्याने राज कुंद्रा हे काम करत असल्याचा संशय आहे. मालवणी पोलिस ठाण्यात काही दिवासांपूर्वी एका तरुणीने केलेल्या तक्रारीवरुन, पोलिसांना या सर्व रँकेटचा छडा लावला होता. त्यावेळी राज कुंद्रा यांना अटकही करण्यात आली होती. याच उद्योगातून राज कुंद्रा यांनी कोट्यवधींची संपत्ती कमावल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अभिनेत्रीला केली होती अटक
मालवणी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या त्यावेळच्या तक्रारीत या तुरुणीने एका रँकेटचा पर्दाफाश केला होता. चित्रपट आणि ओटीटीवर काम मिळवून देण्याच्या नावाखाली काही लोक तरूणींना अश्लील चित्रपटात काम करण्याची जबरदस्ती करत असल्याचे या तक्रारीत म्हटले होते. मुंबईतील अनेक व्यावसायिक अश्लील चित्रपटांचे शूटिंग करून, कोट्यवधी रुपये कमवत असल्याचा दावाही या तक्रारीत करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी मालाड वेस्टमधील एका बंगल्यावर छापा मारला. तो बंगला भाड्याने घेऊन तेथे पॉर्न फिल्मचे शूटिंग करण्यात येत होतं. पोलिसांनी छापा टाकून बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीसह ११ जणांना अटक केली होती.












Click it and Unblock the Notifications