Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

डिसेंबर 2024 मध्ये हे चित्रपट आणि वेब सिरीज OTT वर प्रदर्शित होणार, संपूर्ण यादी पहा

December 2024 Ott Release: आता 2024 वर्ष संपायला फक्त एक महिना उरला आहे. 2025 च्या सुरुवातीपूर्वी अनेक चित्रपट आणि वेब सीरिज OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत. डिसेंबर 2024 हा महिना चित्रपट प्रेक्षकांसाठी खूप मजेशीर असणार आहे. या महिन्यात अनेक सुपरहिट चित्रपट आणि वेब सीरिज OTT वर प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये आलिया भट्टपासून साऊथचा सुपरस्टार सूर्यापर्यंतच्या चित्रपटांचा समावेश आहे.

अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार

जर तुम्हाला रोमँटिक कॉमेडी चित्रपट आणि वेब सीरिजसह थ्रिलर, सस्पेन्स, ॲक्शन पाहणे आवडत असेल तर डिसेंबर 2024 हा तुमचा आवडता महिना असणार आहे. 2024 च्या शेवटच्या महिन्यात OTT वर कोणते चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होणार आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.

december 2024 ott release

हे चित्रपट आणि वेब सिरीज डिसेंबरमध्ये OTT वर प्रदर्शित होतील

जिगरा

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वेदांग रैना यांचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 'जिगरा' 6 डिसेंबर 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा भाऊ-बहिणीच्या जोडीभोवती फिरते. चित्रपटात बहिण आपल्या भावाला वाचवण्यासाठी जीवाचीही पर्वा करत नाही.

कांगुवा

साऊथचा सुपरस्टार सूर्या आणि बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलचा 'कांगुवा' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट 13 डिसेंबर 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज होऊ शकतो.

अग्नि

प्रतिक गांधी, दिव्येंदू, सई ताम्हणकर आणि सैयामी खैर यांचा 'अग्नी' हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी OTT वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. या चित्रपटाची कथा आगीच्या वाढत्या घटनांवर केंद्रित आहे.

अमारन

साई पल्लवी आणि शिवकार्तिकेयन यांचा 'अमारन ' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटगृहांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 11 डिसेंबर 2024 पासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर उपलब्ध होईल.

मिसमॅच्ड सीझन 3

प्राजक्ता कोहली आणि रोहित सराफ यांची रोम-कॉम वेब सीरिज 'मिसमॅच्ड सीझन 3' OTT वर स्ट्रीम होणार आहे. या वेब सिरीजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या वेब सिरीजची कथा एका तरुण जोडप्यावर आधारित आहे, जे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत, परंतु प्रेमात पडतात. 'मिसमॅच्ड सीझन 3' 13 डिसेंबर 2024 पासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रसारित होईल.

'बंदिश बँडिट्स 2

'बंदिश बँडिट्स 2' या म्युझिकल वेब सिरीजचा पहिला सीझन लोकांना खूप आवडला. आता लोकांच्या मागणीनुसार या वेब सिरीजचा दुसरा सीझन रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 'बंदिश बँडिट्स 2' 13 डिसेंबर 2024 पासून OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर स्ट्रीम होईल. या सीझनमध्येही राधे आणि तमन्नाची कहाणी पुन्हा पाहायला मिळणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+