रामनवमीच्या दिवशी ऋतिकच्या कार्यक्रमात बीफ आणि दारु? दानिश कनेरिया 'पुरावा'देत भडकला, कारण...
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोशल मीडियावर त्याच्याबाबत एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. त्या दाव्यानंतर त्याचे चाहते त्याच्यावर चांगलेच संतापले आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियानेही त्याच्या या करारनाम्याचे पुरावे दिले आहेत.

नेमके प्रकरण काय?
ऋतिक रोशन सध्या मीट अँड ग्रीट होली बॅश कार्यक्रम करत आहे. त्या कार्यक्रमाद्वारे तो त्याच्या चाहत्यांना भेटत आहे. हे कार्यक्रम सध्या जगभरात सुरु आहेत. ६ एप्रिलला त्याचा ह्युस्टन येथे कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात गोमांसाचे समोसे व दारु विकली गेल्याचा आरोप काहींनी केला. शिवाय या कार्यक्रमाचा आयोजक पाकिस्तानी आसल्याचा व त्याचा आयएसआय एजंटशी संबंध असल्याचाही दावा करण्यात आला. या सगळ्या प्रकाराची सध्या सोशल मीडियावर पुराव्यासह चर्चा सुरु आहे.
Beef and liquor parties were shamelessly organized during Hrithik Roshan’s show in the U.S. on the sacred occasion of Ram Navami.
— Danish Kaneria (@DanishKaneria61) April 10, 2025
Read this thread to uncover how anti-India networks in the U.S. are collaborating with Bollywood—and why law enforcement continues to look the other… https://t.co/bJcIP4dxk4
दानिशनेही केली पोस्ट
या सगळ्या प्रकरणात पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियानेही एक पोस्ट केली. दानिश कनेरियाने लिहिले की, "अमेरिकेत रामनवमीच्या पवित्र प्रसंगी हृतिक रोशनच्या शो दरम्यान निर्लज्जपणे मांस आणि दारू पार्टी आयोजित करण्यात आली होती." विवेक बन्सल नावाच्या एका वापरकर्त्याची पोस्ट शेअर करताना त्यांनी असेही लिहिले की, "अमेरिकेतील भारतविरोधी नेटवर्क बॉलिवूडशी कसे सहकार्य करत आहे हे जाणून घेण्यासाठी ही पोस्ट वाचा."
चाहत्यांनी व्यक्त केला संताप
या सगळ्या कार्यक्रमाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हृतिक रोशनला सोशल मीडियावर लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. या कार्यक्रमाचे आयोजक पाकिस्तानी आहेत आणि भारतात काळ्या यादीत असलेल्या आयएसआय एजंटच्या जवळचे आहेत, असा दावाही केला जात आहे. या सर्व गोष्टींबद्दल सोशल मीडियावर लोक हृतिक रोशनवर रागावलेले दिसत आहेत. यावर हृतिकने स्पष्टीकरण द्यावे, असेही काहींचे म्हणणे आहे.












Click it and Unblock the Notifications