Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'क्राइम पेट्रोल' अभिनेता नितीन चौहान यांचे निधन, 35 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, मृत्यूबद्दल गुढ

Crime Patrol TV actor Nitin Chauhan passed away :'क्राइम पेट्रोल' आणि 'स्प्लिट्सविला' सारख्या शोमध्ये दिसलेला चतुरस्त्र अभिनेता नितीन चौहानचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 35 व्या वर्षी नितीन चौहान यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त सर्वच माध्यमात आले आहे.

एवढ्या लहान वयात अभिनेत्याच्या निधनाने इंडस्ट्रीतील लोकांना मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध टीव्ही रिॲलिटी शो 'दादागिरी 2' जिंकणारा अभिनेता नितीन चौहान याचे 7 नोव्हेंबर 2024 (गुरुवार) रोजी मुंबईत निधन झाले.

Crime Patrol TV actor Nitin Chauhan passed away

नितीन चौहाण मूळ अलिगढ येथील

नितीन हा मूळचा अलिगढ, उत्तर प्रदेशचा. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ते मुंबईत आला होता. नितीन चौहानने 'दादागिरी 2' हा शो जिंकला होता. प्रसिद्ध टीव्ही रिॲलिटी शो 'दादागिरी 2' जिंकल्यानंतर नितीन याला खूप प्रसिद्धी मिळाली. याशिवाय एमटीव्हीच्या 'स्प्लिट्सविला 5', 'जिंदगी डॉट कॉम', 'क्राइम पेट्रोल' आणि 'फ्रेंड्स' या शोमध्येही तो दिसला आहे.

'या' अभिनेत्रीने दिली नितीनच्या मृत्यूची माहिती

नितीनच्या मृत्यूची माहिती त्याच्या सह-अभिनेत्री असलेल्या विभूती ठाकूरने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे दिली आहे.सोशल मीडियावरील तिच्या एका पोस्टमध्ये, विभूतीने अभिनेत्याचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती त्याला मिठी मारताना दिसत आहे. त्यांनी पोस्टवर लिहिले आहे- माझ्या प्रिय, शांततेत विश्रांती घे. ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो. 'माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या शरीराइतके मानसिकदृष्ट्या मजबूत असता' असा मजकूर तिने लिहीला आहे.

काय आहे विभूती ठाकूर यांची पोस्ट?

"विभूती ठाकूर यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले - हे खरोखर आश्चर्यकारक आहे, मला याचे खूप दुःख झाले आहे. माझी इच्छा आहे की तुम्हाला इतके धैर्य आणि सामर्थ्य मिळावे की तुम्ही तुमच्या समस्यांना तोंड देऊ शकाल. माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या शरीराइतकेच मानसिकदृष्ट्या मजबूत असता."

नितीन चौहाण यांनी आत्महत्या केली?

अभिनेता विभूती ठाकूर व्यतिरिक्त, अभिनेत्री सायंतानी घोष आणि सुदीप साहिर यांनी देखील नितीन चौहानच्या मृत्यूला पुष्टी दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नितीन चौहान यांचा मृत्यू कसा झाला हे कळू शकलेले नाही. अशा परिस्थितीत अभिनेत्याच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे काही अहवाल सांगत आहेत.

सोशल मीडियावर श्रद्धांजली

पोलीस या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत, दुसरीकडे नितीन चौहान यांच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांचे चाहते दु:खी झाले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. नितीन चौहानचा मृतदेह घेण्यासाठी अभिनेत्याचे वडील मुंबईत पोहोचले आहेत. याशिवाय पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. नितीन चौहान यांच्या मृत्यूबाबत सध्या नितीनच्या वडिलांकडून किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+